शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मनकर्णिका कुंडावरील शौचालय पाडले

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

अंबाबाई मंदिर परिसर : भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेट; आमदारांसह शिवसैनिकांना ताब्यात घेऊन सोडून दिले

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय वारंवार मागणी करूनही महापालिकेने न हटवल्याने अखेर सोमवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी ते पाडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मंदिरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदारांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.अंबाबाई मंदिर परिसरातील महालक्ष्मी उद्यानात पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र याखाली अंबाबाई मूर्तीच्या स्नानाचे पाणी जाते ते मनकर्णिका कुंड आहे. या कुंडावरील शौचालय हटवावे, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली होती. विधानसभा अधिवेशनावेळीही आंदोलन केले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही वारंवार त्याचा पुनरुच्चार करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासन व महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आमदार क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मंदिराच्या आवारात आले व त्यांनी शौचालय पाडायला सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ही जागा देवस्थान समिती अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे १९५२ साली महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे देवस्थान समिती यात हस्तक्षेप करू शकत नव्हती. अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. येथे पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, अभियंता सुदेश देशपांडे, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता एस. के. पाटील उपस्थित होते. यानंतर आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. संध्याकाळी उशिरा महापालिकेच्यावतीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या तक्रारीची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)