शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ओंकार पतसंस्थेच्या व्यवस्थापिका निलंबित

By admin | Updated: September 8, 2015 23:36 IST

आर्थिक घोटाळाप्रकरणी कारवाई

देवरुख : देवरुख शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ओंकार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याला जबाबदार असलेल्या व्यवस्थापिका वासंती अनिल निकम यांच्यावर संचालक मंडळाने ठराव करुन निलंबनाची कारवाई केली आहे.निलंबनाच्या ठरावाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. ओंकार पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यामुळे देवरुख शहरात एकच खळबळ माजली होती. याचवेळी संचालक मंडळाची धावाधाव सुरु झाली होती. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लेखापरीक्षण करुन घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आणि २८ आॅगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक गैरव्यवहार झाल्याची कबुली देण्यात आली. या साऱ्या घोटाळ्याला व्यवस्थापिका वासंती निकम दोषी असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, घोटाळा संचालक मंडळाच्या निदर्शनास येताच २४ आॅगस्टपासून व्यवस्थापिका निकम या पतसंस्थेत हजरच राहू शकल्या नाहीत म्हणून सद्यस्थितीत संचालक मंडळाच्या ठरावानुसार पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक पदावरून ३ सप्टेंबर २०१५पासून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र देऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पत्रामध्ये संचालक मंडळाने म्हटले आहे की, ओंकार पतसंस्थेत व्यवस्थापिका म्हणून सेवेमध्ये कार्यरत असताना वेगवेगळ्या दिवशी अगर तारखांना बऱ्याच रकमांची अफरातफर केल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारची अफरातफर करताना खोट्या नोंदी, खोदी कागदपत्र, तसेच सॉफ्टवेअरमधील पासवर्डचासुद्धा त्यासाठी बेकायदेशीर वापर करुन हा गैरव्यवहार केला असल्याचे दिसत आहे. याबरोबरच पतसंस्थेचा गैरमार्गाने तोटा करीत संचालक मंडळ व अध्यक्ष यांनी याबाबतीत व्यवस्थापिका म्हणून आपल्याकडे चौकशी केली असता समर्पक उत्तरे अगर स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत. मात्र, यावेळी काही संचालकांसमोर व अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमोर गैरव्यवहाराबाबतची कबुली दर्शविली आहे आणि जिल्हा सत्रन्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करुन अल्प मुदतीचे संरक्षण घेतल्याचे संचालक मंडळाच्या निदर्शनास आले.या गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाकडून तपासकाम सुरु असून, सर्व कागदपत्रांची शहानिशा व पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. लेखा परीक्षणानंतरच नकली रक्कम स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)संचालक मंडळाने ठेवला ठपका.लेखापरीक्षणानंतर आर्थिक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब.पासवर्डचाही गैरवापर.