शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिमेंटच्या जंगलात माणूस ‘एकटाच’

By admin | Updated: December 26, 2014 00:05 IST

चित्रपट महोत्सव : बाळकृष्ण व संतोष शिंदे यांचा रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामध्ये राहणाऱ्या माणसाकडे खूप सुखसुविधा आहेत; पण त्यांचा मनस्वीपणे उपभोग घेता येत नाही. कधी घड्याळाच्या काट्यावर, कधी ताणतणाव, गर्दीतही वाट्याला येणारे एकटेपण, विचित्र जीवनशैली यांमुळे खेळ करणाऱ्या माकडासारखी माणसाची अवस्था झाली आहे. या अवस्थेकडे निरागस नजरेतून पाहणाऱ्या मुलाची कथा म्हणजे ‘अपसाइड डाउन’ हा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया देत सहदिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे व अभिनेता संतोष शिंदे, विकास पाटील यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, गुरुवारी या चित्रपटाच्या चमूने रसिकांना चित्रपटाच्या निर्मितीेचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, खेड्यात राहणाऱ्या लहान मुलाला शहरात सर्कस आल्याचे कळते. ती पाहण्यासाठी तो या शहरात येतो; पण येथे प्रत्येकाची सुरू असलेली जगण्याची लढाई, घड्याळामागे सुरू असलेली धावाधाव, गर्दीत राहूनही वाट्याला येणारे एकटेपण हे सगळे तो अनुभवतो. माणूसपण हरवलेल्या माणसाची सर्कशीतील माकडासारखी झालेली अवस्था आणि त्याकडे बघण्याचा त्या मुलाचा दृष्टिकोन सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो. या चित्रपटात शुभम मोरे, पार्थ भालेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संवादानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाचा आस्वाद घेतला. दिवसभरात अपूर पांचाली, द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल, बेस्ट्स आॅफ द सदर्न वाइल्ड, अपसाइड डाउन, गोल्ड अ‍ॅँड कॉपर आर्टिस्ट, अग्निपंख, कँडल मार्च, लाईक फादर-लाईक सन हे चित्रपट दाखविले.महोत्सवात आज स्क्रीन नं १ :  कँडल मार्च (मराठी), लाइक फादर-लाईक सन (जपान), द कफिन मेकर (गोवा).स्क्रीन नं २ : गोल्ड अ‍ॅँड कॉपर (इराण), वाइंड्स आॅफ सप्टेंबर (तैवान), अपसाइड डाउन (मराठी), बेस्ट्स आॅफ सदर्न वाईल्ड (यूएसए), कागज के फूल (हिंदी).स्क्रीन नं ३ : इंडियन पॅनोरामा शॉर्ट फिल्म. ४ वाजता : मिफ १४ शॉर्ट फिल्म.