शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मालोजीराजे महापौरांसोबत येणार एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: March 13, 2015 23:57 IST

अंतर्गत राजकारणाला उफाळी : सभागृहातही पाठिंबा लाभणार

कोल्हापूर : रमणमळा येथील जलतरण तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १६) होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर तृप्ती माळवी भूषविणार आहेत. महापौर बहिष्कारप्रकरणानंतर मालोजीराजे गटाचे नगरसेवक थेटपणे महापौरांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले हाते. आता थेट राजेच महापौरांसमवेत एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महापालिकेतील अंतर्गत राजकारणास उफाळी आली आहे. महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लाचप्रकरणात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यातून महापौरांविरोधात सभागृह व सभागृहाबाहेर असहकार्याची घोषणाही नगरसेवकांनी केली आहे. शहरातील रस्त्यांचे उद्घाटन असो किंवा आरोग्य शिबिर, शोकसभा असो किंवा जयंतीचा कार्यक्रम महापौर व नगरसेवक यांनी दोन-दोनवेळा एका ठिकाणी, एकाच दिवशी उद्घाटनाचे कार्यक्रम केले. महापौर व नगरसेवकांतील दरी वाढत असतानाच नगरसेवक सत्यजित कदम यांनी सत्ताधारी आघाडीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली.सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांची उपस्थिती वाढत असतानाच त्यास मालोजीराजे गटाचे पाठबळ मिळू लागले. महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या संभाजीनगरातील रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास राजे गटाच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविली. त्यानंतर मालोजीराजे पुण्यात असल्याने चार दिवसांत भूमिका स्पष्ट करतील, असा खुलासा करण्यात आला होता. मात्र, आता मालोजीराजे महापौरांसह एका व्यासपीठावर येत असल्याने त्यांची भूमिका आपोआपच स्पष्ट होत असल्याची चर्चा महापालिकेत आहे.. त्यामुळे आतापर्यंत महापौरांना सभागृहाबाहेर मालोजीराजे गटाचा असणारा पाठिंबा सभागृहातही मिळण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)महापौरांना आमदार महादेवराव महाडिक यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा उघड पाठिंबा आहे. मालोजीराजे महापौरांसह जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने राजे गटास महापौरांचे वावडे नाही, आपसूकच हा संदेश जाणार आहे. त्यानंतर मात्र, तळ्यात-मळ्यात असणारे दहा-बारा नगरसेवक उघडपणे महापौरांच्या छावणीत दाखल होण्याची चिन्हे आहेत.