कोल्हापूर : महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या संभाजीनगरातील रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आठहून अधिक नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविली. यात मालोजीराजे गटाचे नगरसेवकही उपस्थित होते. दरम्यान, मालोजीराजे यांना पुणे येथे नगरसेवकांचे शिष्टमंडळ भेटले. दोन दिवसांत गटाची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.संभाजीनगर प्रभाग क्रमांक ६२च्या नगरसेविका माधुरी नकाते यांच्या निधीतून एन.सी.सी. कार्यालय ते पद्मावती मंदिर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी अकरा वाजता झाला. महापौर तृप्ती माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास सत्यजित कदम, रवीकिरण इंगवले, किरण शिराळे, राजू घोरपडे यांच्यासह मालोजीराजे यांना मानणारे दिगंबर फराकटे, राजाराम गायकवाड, प्रकाश नाईकनवरे हे नगरसेवक उपस्थित होते. महापौरांना आमदार महाडिक गटाचे पाठबळ आहे. आता मालोजीराजे गटाचा पाठिंबा महापौरांना लाभणार आहे.
महापौरांना मालोजीराजे गटाचे ‘बळ’
By admin | Updated: March 10, 2015 00:16 IST