शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोफण तयार, योग्यवेळी दगड भिरकावणार

By admin | Updated: February 26, 2017 01:01 IST

सदाभाऊ खोत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुही वाढणार

कोल्हापूर : वेळ आलीच तर कोणते खत, कोणते बियाणे वापरावे याची जाण आहे; कोणत्या पाखरांना कसे हाणायचे त्याचीही माहिती आहे. पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाणण्यासाठी गोफण तयार आहे, ती भिरकावण्यासाठी सज्ज आहे, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिला. त्यामुळे संघटनेतील दुही व त्यांचे संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबरचे संबंध दुरावल्याचे मानले जात आहे.खासदार शेट्टी यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवाय त्यांचा मुलगा सागर याच्या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील (जि. सांगली) ते प्रचारासाठीही फिरकले नाहीत; त्यामुळे त्याचा निसटता पराभव झाला. हा पराभव सदाभाऊंच्या फारच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २४) ही त्यांनी सांगलीत बोलताना शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘तुमची तत्त्वे तुम्हांला लखलाभ होवोत. सागरच्या पराभवाने शेट्टी यांना आत्मिक समाधान मिळाले असेल,’ अशी टीकाही त्यांनी केली होती. तोपर्यंत शनिवारी त्यांनी पुन्हा टीका करून संघटनेपासून दूर जात असल्याचेच संकेत दिले.तत्त्वांचा बुरखा पांघरून फार दिवस राजकारण करता येत नाही, असा वार करीत सदाभाऊंनी खासदार शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. शेट्टी यांनी जर आपल्या मुलाचा प्रचार केला असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगत सागर खोत यांच्या निसटत्या पराभवाबद्दल खोत यांनी खंत व्यक्त केली. राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांबाबत अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या अभ्यासाचा सरकारला, शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचे सदाभाऊंनी नमूद केले. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताकदीने काम करीन. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांचे नेतृत्व शेतकरी करील. मी कुणाच्या आरोपांची पर्वा करीत नाही, असेही सदाभाऊ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) ——————-हिटलर वाचण्याची इच्छा नाही‘मी आयुष्यात गांधी वाचला आहे. हिटलर वाचण्याची कधी इच्छाच झाली नाही. व्यक्तिस्वातंत्र्य द्या, ही महात्मा गांधी यांची शिकवण आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले पाहिजे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. त्यामुळे सल्लागार कोण आहेत हे नेतृत्त्वाने पाहावे. मला वेगळे काही करायचं नाही. आम्ही दोघे जिवलग मित्र आहोत. मतभेद होते ते लपवण्याचे काही कारण नाही. मात्र टोकाचे मतभेद नाहीत,’ असाही निर्वाळा सदाभाऊंनी दिला.——————माझा मुलगा चळवळीतून पुढे आला. नवे नेतृत्व तयार व्हावे म्हणून निवडणूक लढविली; परंतु जनतेने दिलेला कौल मान्य आहे. मुलाच्या पराभवाची जबाबदारी मान्य करतो.- सदाभाऊ खोतकृषी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते.