शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खेळासाठी मनपाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी

By admin | Updated: March 17, 2015 00:11 IST

मालोजीराजे : जलतरण तलावाचे उद्घाटन

कोल्हापूर : नेमबाजी, जलतरण, शरीरसौष्ठव, फुटबॉल, क्रि केट, कुस्ती, हॉकी अशा सर्व प्रकारच्या खेळ प्रकारात कोल्हापूरच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावला आहे. त्या मानाने मनपातर्फे खेळाडूंना अत्यंत तोकड्या सुविधा उपलब्ध आहेत, क्रीडाक्षेत्रातील उज्ज्वल परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी महापालिकेने क्रीडा क्षेत्रासाठी वेगळ्या स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी सूचना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केली. रमणमळा येथील जलतरण तलावाचे २५ लाख रुपये खर्चून नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. थाटात झालेल्या या कार्यक्रमासाठी नगरसेवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूर ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत येथील खेळाडू सराव करतात. नगरसेवकांना पाच लाखांचा निधी मिळतानाही मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत तलावासाठी २५ लाखांचा निधी सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानेच उपलब्ध होऊ शकला. क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.  जलतरण तलावाच्या देखभालीवर मोठा खर्च येतो. देखभालीत कोणतीही कसूर करू नका. नगरसेवकांच्या वशिल्याने कोणीही मोफत पोहण्याचा प्रयत्न करू नका. येत्या आर्थिक बजेटमध्ये क्रीडाक्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महापौर तृप्ती माळवी यांनी दिले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, कांचन कवाळे, सरस्वती पोवार, माधुरी नकाते, शशिकांत पाटील, किरण शिराळे, जहाँगीर पंडत, श्रीकांत बनछोडे, राजू घोरपडे, दिगंबर फराकटे, संभाजी जाधव, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आदी उपस्थित होते.