जयसिंगपूर : राज्यातील जनतेच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असा आदेश आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.
राज्यातील जनतेच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील एकूण लोकसंख्या आणि अन्न व्यावसायिकांच्या संख्येनुसार अन्न व औषध प्रशासन विभागात सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीसह जिल्हा स्तरावर न्यायनिर्णय अधिकारी म्हणून उपायुक्त(अन्न) या दर्जाचे पद निर्माण करावे, सहायक अन्न सुरक्षा अधिकारी आणि कंत्राटी पद्धतीने आवश्यक मनुष्यबळ, विभागीय स्तरावर अद्ययावत प्रयोगशाळा आणि वाहन व्यवस्थेबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावेत. याबाबत आढावा घेऊन राज्यमंत्री यड्रावकर यांनी आदेश दिला.
राज्यातील एकूण लोकसंख्या आणि अन्न व्यावसायिकांची संख्या यांच्या प्रमाणात अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याबाबत महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री यड्रावकर यांना दिले होते. त्यानुसार मुंबई येथे झालेल्या बैठकीत अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. यावेळी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो - २००१२०२१-जेएवाय-०४-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर