शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

माध्यमांनी विकासाचे साथीदार बनावे

By admin | Updated: October 16, 2015 00:10 IST

देवानंद शिंदे : ‘फेम’, ‘आसमा’, होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन, प्रेस क्लबतर्फे राष्ट्रीय जाहिरात दिन पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : माध्यम, जाहिरात क्षेत्राचे सामाजिक परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी आता शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील विकासाचे साथीदार बनावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी येथे केले.‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ ही संकल्पना घेऊन फेडरेशन आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅँड मार्के टिंग एन्ट्रप्रुनर्स (फेम), अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज अ‍ॅण्ड मीडिया असोसिएशन (आसमा), कोल्हापूर होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य मूलभूत गरजांमध्ये आता माध्यमांची भर पडली आहे. त्यात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडियासह जाहिरात क्षेत्राचा समावेश आहे. सामाजिक परिवर्तनामध्ये माध्यम व जाहिरात क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून ही क्षेत्रे प्रभावशाली आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्रांतीने नवी आव्हाने उभारली असून जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज असून त्यादृष्टीने माध्यम, जाहिरात क्षेत्राने प्रबोधन करावे. शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रांतील विकासाचे साथीदार म्हणून कार्यरत राहावे.कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झाले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘आसमा’चे उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, खजानिस राजाराम शिंदे, कोल्हापूर होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खमितकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विकास कांबळे, आदी उपस्थित होते. अनंत खासबारदार यांनी स्वागत केले. ‘फेम’ व ‘आसमा’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. विवेक मंद्रुपकर यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ नाबर यांनी आभार मानले. पुरस्कार : माध्यमातील ज्येष्ठांचा सत्कारकार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते किशोर संकपाळ (वरिष्ठ जाहिरात अधिकारी, लोकमत), सुरेश पवार (वरिष्ठ कार्यकारी संपादक, पुढारी), विजय जाधव (निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स), संजय पाटोळे (सहसंपादक, सकाळ), विजय धामणेकर (वितरण प्रतिनिधी, तरुण भारत), आनंद जगदाळे (मुद्रितशोधक, पुण्यनगरी), मनोज कुलकर्णी (ज्येष्ठ व्हिडिओ एडिटर, बी चॅनेल), उदय कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, राजेंद्र मकोटे (मुक्त पत्रकार) यांना राष्ट्रीय जाहिरात दिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. उदय कुलकर्णी यांच्यावतीने जगन्नाथ कुलकर्णी आणि प्रभाकर कुलकर्णी यांच्यावतीने प्रसन्न कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. सरस कामगिरी करू व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन ‘फेम’ व ‘आसमा’ने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. कोल्हापुरातून ‘आसमा’च्या माध्यमातून सुरू झालेली ‘फेम’ आता नागपूर, जळगावपर्यंत पोहोचल्याचे ‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, नवतंत्रज्ञान आत्मसात करून मुंबई, पुण्याच्या संस्थांपेक्षा कोल्हापुरातील संस्थांच्या सरस कामगिरीसाठी प्रयत्न करू.कुलगुरू म्हणाले...पाण्याच्या नियोजनातील अभाव माध्यम, जाहिरात क्षेत्राने समोर आणावा.कोल्हापुरातील विविध क्षेत्रांमधील गुणवत्ता पुढे नेण्यासाठी बळ द्यावे.युवा पिढीकडून तंत्रज्ञानाच्या विवेकपूर्ण वापरासाठी प्रबोधन करा.‘एम-लर्निंग’च्या दिशेने पावले टाकावीत.