शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञानाने समृद्ध होईल

By admin | Updated: December 23, 2016 00:52 IST

विवेक सावंत : बुद्धिमान तरुण हीच देशाची ताकद

गडहिंग्लज : भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण आणि गोर-गरीब शाळकरी मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून, हीच खरी देशाची ताकद आहे. या बुद्धिमत्तेला पुरेपूर वाव दिल्यास ज्ञानरचनावादी समाजाची निर्मिती अशक्य नाही. सध्याच्या ज्ञानयुगातील संधी मानून मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञान समृद्ध होईल, असे प्रतिपादन ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘ज्ञानयुगात भारताची झेप : आव्हाने व संधी’ याविषयावर त्यांनी चौथे पुष्प गुंफले. आदिमकालातील शेतीच्या शोधापासून ते २१ व्या शतकातील महासंगणकाच्या निर्मितीपर्यंतच्या देशातील स्थित्यंतराविषयी त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सोदाहरण विवेचन केले. त्यास श्रोत्यांनी विशेष दाद दिली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते.यावेळी सावंत म्हणाले, शेती आणि उद्योगप्रधान व्यवस्थेनंतर माहितीप्रधान व्यवस्थेचा जन्म झाला. माहितीवर प्रक्रिया करून त्यातून संपत्तीची निर्मिती केली जाऊ लागली. त्यातूनच संगणकाचा जन्म झाला. महासंगणकाच्या निर्मितीद्वारे भारताने संपूर्ण विश्वाला आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेची झलक दाखविली आहे.माहितीच्या युगात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गोर-गरिबांचे प्रश्न यावरही उतारा शोधता येईल. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती व प्राथमिकता ठरविण्याची गरज आहे. तसे झाल्यास या प्रश्नांवर आंदोलने करण्याची देखील गरज भासणार नाही. बौद्धिी स्वामित्वाच्या मानधनाचे पैसे आपल्या देशातच राहण्यासाठी अधिकाधिक संशोधनांचे स्वामित्व आपल्याकडे असायला हवे. मात्र, त्यासाठी नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. किंबहुना, त्यास प्रोत्साहन देणाऱ्या नव्या शिक्षण पद्धतीची आज देशाला गरज आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. नगरसेविका अ‍ॅड. नाज खलिफा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजश्री कोले यांनी अतिथी परिचय करून दिला. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साने गुुुरुजीलोकशिक्षणव्याख्यानमाला