शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कलाकाराने स्थान निर्माण कराव

By admin | Updated: January 30, 2015 00:15 IST

अलका कुबल : जयसिंगपुरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटने

जयसिंगपूर : कलाकाराने आपल्या क्षेत्रातील आदर्श जरूर ठेवावेत, पण स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जयसिंगपूरमध्ये राजर्षी शाहू महोत्सवानंतर एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना उमेद देणेचे कार्य ‘आम्ही रसिक’ संस्थेने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल यांनी केले. येथील राजर्षी शाहू खुले नाट्यगृहात दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट व आम्ही रसिक आयोजित राजर्षी शाहू करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री अलका कुबल बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खामकर होत्या. यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, उद्योगपती विनोद घोडावत, महेंद्र सावंत, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, परीक्षक भालचंद्र पानसे, शिल्पा सावंत उपस्थित होते.अभिनेत्री कुबल म्हणाल्या, माझ्या उमेदीच्या काळात हौशी व व्यावसायिक नाट्यक्षेत्रात काम केले. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतर रंगभूमीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले, याची मला खंत वाटते. प्रारंभी दीपप्रज्वलन, नटराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत आम्ही रसिक संस्थेचे कार्यवाह स्वरूपा पाटील-यड्रावकर, तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी केले. उद्योगपती दानचंद घोडावत, डॉ. अतिक पटेल, नंदू मिणीयार, स्नेहा शिंदे, संगीता पाटील-कोथळीकर, संभाजी मोरे, युवराज शहा, मधुसूदन मालू, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, सागर आडगाणे, उल्हास माळगी, रवींद्र ताडे, राजेश मालू, अजित उपाध्ये, बबन यादव, बाळ बरगाले, चेतन चौधरी, शब्दा कुंभार, शिरीष यादव, बी. बी. गुरव, माधुरी चौगुले, जायंट्स अध्यक्षा डॉ. नलीनी पाटील, यांच्यासह नाट्यरसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र झेले यांनी केले. रमेश यळगुडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)एकांकिका सादर झाल्याउद्घाटनानंतर दि चेंज, पांढऱ्या घोड्यावरील राजपुत्र, वैकुंठाचा स्वर्ग, एक तू एक मी आणि. . , गेला श्याम्या कुणीकडे, टेम्पल एम्प्लोएमेंट अशा एकांकिका सादर करण्यात आल्या. १ फेब्रुवारीपर्यंत एकांकिका स्पर्धा होणार आहेत. जयसिंगपूर येथे गुरुवारी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते झाले. यावेळी विनोद घोडावत, सुनीता खामकर, स्वरूपा पाटील-यड्रावकर, मिलिंद शिंदे, महेंद्र सावंत, संजय पाटील-यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते.