शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत आमच्याकडेच

By admin | Updated: March 14, 2017 00:39 IST

दोन्ही कॉँग्रेसचा दावा : ‘पी.एन.’-मुश्रीफ-सतेज पाटील बैठक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर आमच्याकडेच असल्याचा दावा कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केला. जिल्हा परिषदेमधील सत्तेची गोळाबेरीज करण्यासाठी उभय नेत्यांची कोल्हापुरात बैठक झाली. यामध्ये संख्याबळाची सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजता’सह मित्रपक्षांचे संख्याबळ ४० पर्यंत पोहोचले असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच अध्यक्ष होणार, असा दावा रविवारी केला होता. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेस पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची सोमवारी सकाळी कोल्हापुरात बैठक झाली. यामध्ये पंचायत समित्यांमधील दोन्ही कॉँग्रेसचे संख्याबळ आजमावण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत चंद्रकांतदादांना ‘चमत्कार’ घडवू न देण्याचा निर्धार या नेत्यांनी केला. दोन्ही कॉँग्रेस एकत्र येऊन पंचायत समित्यांमध्ये कोणाची मदत घ्यायची या विषयीही चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या दाव्याबाबत चर्चा करून कोण कोणाबरोबर जाऊ शकते, याचीही अटकळ उभय नेत्यांनी बांधली. सत्तेसाठी टोकाचा संघर्ष झाला तर आपल्या बरोबर कोण राहू शकते, याची चाचपणीही यावेळी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याची व्यूहरचना या नेत्यांनी यावेळी केली. जोडण्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावरशिवसेनेसह इतर स्थानिक आघाड्यांबाबत चर्चा करण्याची जबाबदारी बैठकीत सतेज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर पाटील यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस इतरांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करणार यात कोणतीही शंका नाही. त्यासाठी आमची बैठक झाली. यामध्ये सत्ता स्थापनेची व्यूहरचना ठरविण्यात आली. - आमदार सतेज पाटील पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेबाबत आढावा घेतला. कोणी कितीही चमत्काराची भाषा केली तरी जिल्हा परिषदेवर सत्ता आमचीच येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. - आमदार हसन मुश्रीफ