शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरवणी’ परीक्षेत महाराष्ट्र नापास !

By admin | Updated: March 27, 2015 00:22 IST

तांत्रिक अडचणी : इच्छाशक्तीचा अभाव, अंमलबजावणी शक्य

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दहावी, बारावीसाठी पुरवणी परीक्षा घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने सविस्तर अभ्यास केला होता. मात्र, तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांमुळे पुरवणी परीक्षेचा निर्णय होऊन अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नापास झाले. अलीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशी परीक्षा घेणे शक्य असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांना महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा व निकाल वेळेवर लागावे, अशी विद्यार्थी, पालकांची अपेक्षा असते. निकाल जितका लांबणीवर, तितका अधिक काळ विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतो. करिअरची दिशा ठरविण्यासाठी विचार करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. कर्नाटकात महिन्यात निकाल लागल्याने करिअरची दिशा ठरविण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे येथील मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्यासाठी सविस्तर अभ्यास केला.कर्नाटकात कशा पद्धतीने नियोजन केले जाते, त्याची माहिती घेतली. मात्र, महाराष्ट्रात पुरवणी परीक्षेची यंत्रणा राबविण्यात अडचणी दिसू लागल्या. शासनाच्या शिक्षण विभागानेही विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. मंडळाने दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेऐवजी दोन विषयांत नापास असला, तरी पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची मुभा दिली. त्यामध्ये अकरावी किंवा अन्य अभ्यासक्रमांची मुख्य परीक्षा देण्यापूर्वी नापास विषय सोडविणे बंधनकारक केले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यास नापास असलेल्या दोन विषयांचा आणि पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करताना ताण पडतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी याचा फारसा फायदा झाला नाही. बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबरच पर्याय राहिला.अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे शिक्षण संस्थांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक वर्ष वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव वाढविल्यास पुढील शैक्षणिक वर्षात पुरवणी परीक्षेचा निर्णय होणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर भाजप शासनाने तरी दहावी, अकरावी व बारावीसाठी पुरवणी परीक्षा घ्यावी, अशी मागणी आहे. कर्नाटकच्या धर्तीवर पुरवणी परीक्षा महाराष्ट्रात घेण्यासंबंधी मंडळाने पाच वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रश्नपत्रिका विविध भाषेत भाषातंर करणे, परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभा करणे, अशा अडचणी समोर आल्या. त्यामुळे पुरवणी परीक्षेऐवजी दहावीत दोन विषयांत नापास असल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.- उज्ज्वला पाटील, माजी अध्यक्षा, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळपुरवणी परीक्षा घ्यानापासांचे वर्ष वाचवा ३