शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’मध्ये महाराष्ट्र सलग सत्तावीस वर्षे अव्वल

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

राज्यातील ११२ विद्यार्थी पात्र : जिल्ह्यातील दोन विद्यार्थी

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला. यंदा राज्यातील ११२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, यांपैकी ९९ मुले आणि १३ मुली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सलग २७ वर्षे देशात महाराष्ट्राने शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरण्यात ‘नंबर वन’ राखला आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र), गणित, भूमिती यांसह सामान्य बौद्धिक क्षमता कसोटीवर परीक्षा घेण्यात आली.सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातून ३,४६६, तर संपूर्ण राज्यातून लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गुणवत्तेनुसार राज्यात शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. इचलकरंजी येथील हृषीकेश श्रीकांत शिंदे (आंतरभारती विद्यालय), शुभंकर प्रसाद रानडे (व्यंकटराव हायस्कूल) हे दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती, तर पीएच.डी. केल्यास चार वर्षे विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळणार आहे.मराठी माध्यमाचे २२ आणि इंग्रजी माध्यमाचे ९०, तर राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकत असलेले ५६, ‘सीबीएसई’चे ५३, ‘आयसीएसई’चे ३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्यांमध्ये सर्वसाधारण जातींचे ९९, अनुसूचित जातींचे १०, अनुसूचित जमातींचे २ आणि अपंग १, असे विद्यार्थी आहेत.राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या राष्ट्रीय स्तरावर एक हजार शिष्यवृत्ती आहेत. यंदा राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ११२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. गेली २७ वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळवून पहिला क्रमांक कायम राखला आहे, ही अभिमानाची बाब आहे. - व्ही. बी. पायमल, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) दहा जिल्ह्यांत एकही नाहीसांगली, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, अमरावती, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला नाही. सातारा, रत्नागिरी, मुंबई (दक्षिण), अहमदनगर, नाशिक, धुळे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक विद्यार्थी पात्र ठरला आहे. उर्वरित जळगाव- ६, मुंबई (पश्चिम)- १०, मुंंबई (उत्तर)- ९, रायगड- ३, ठाणे - २०, पुणे- १२, सोलापूर- २,औरंगाबाद- १८, बीड- ५, बुलढाणा- २, अकोला- ७, नागपूर- २, गोंदिया- २, नांदेड- २.