सांगली : चेन्नई (तामिळनाडू) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर थ्रो बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असल्याची माहिती थ्रो बॉल संघटक राहुल वाघमारे यांनी दिली.धारावी (मुंबई) येथे भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुलामध्ये राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. निवडलेला संघ असा : मुले : मेघनाथ जावळे, केशवराज भडंगे, यश ओझा, उदित देशपांडे, रोहित राऊत, अनिकेत भुजबळ, रिध्देशमुळे, दर्शित जैन, जयम खिमावत, मंदार सरनोबत, मयूर बोहीर, दीपक सिंग, भवू बोथरे. महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचा महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनच्या अॅडहॅक कमिटीचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी सत्कार केला. (क्रीडा प्रतिनिधी)निवड झालेल्या मुलीगायत्री दातार, ऋतुजा माने, विधी शहा, विधी रांका, सौंदर्य तांबे, रक्षा बनकर, अक्षता कोळेकर, श्वेता कुलकर्णी, श्वेता जंगडे, वृषाली गायकवाड, गुरूत्वा संकपाळ, आदिती संकपाळ.
राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST