डॉक्टर, मेडिकल, एम. आर. असोसिएशन, ग्रामपंचायत हेरले व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने सुरू करण्यात आलेले ताप उपचार केंद्र व कोविड सेंटर सुरू आहे. त्यामध्ये स्वतःच्या खर्चाने डॉक्टर असोसिएशनने अँटिजेन व आरटीपीसीआर टेस्ट मोफत करण्यात आले आहे. चाचणीनंतर कमी लक्षणे असलेले पेंशट घरी न पाठवता सेंटरमध्येच थांबविले जातात व सर्व औषध उपचार मोफत केला जातो. लक्षणे जादा असल्यास घोडावत कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. यामुळे मृत्यूदर थांबला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्या सर्व कामाचे कौतुक आमदार आवळे यांनी केले. महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारखे आपले कार्य आहे व आपल्या कार्याची दखल जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांना घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.
या वेळी पोलीस पाटील नयन पाटील, वैदयकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, तलाठी संदीप बरगाले, डॉक्टर्स असो.चे डॉ. अमोल चौगुले, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. नितीन चौगुले, डॉ. इम्रान देसाई, डॉ. सुरेखा आलमान, मेडिकल असोसिएशनचे प्रवीण पाटील, डेव्हिड लोखंडे, अर्जुन पाटील, राजेंद्र कचरे, कोतवाल महमंद जमादार आदी उपस्थित होते.
फोटो: हेरले (ता. हातकणंगले)येथे कोविड सेंटरच्या भेटीप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे यांना माहिती देत असताना डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अमोल चौगुले व इतर.