शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

महाराष्ट्र केसरी स्पर्धा मुरगूड येथे भरविणार

By admin | Updated: January 12, 2015 00:36 IST

रणजित पाटील : ग्रामीण मल्लांना प्रोत्साहत

मुरगूड : कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुस्तीला चांगले दिवस येत आहेत; पण ग्रामीण भागातील मल्लांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने ते मागे राहत आहेत. यासाठी मुरगूडमध्ये कुस्ती संकुल लवकरच सेवेसाठी सज्ज राहील. मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दरवर्षी राज्यस्तरीय सर्वोच्च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुरगूडमध्ये भरविणारच, असा विश्वास गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित पाटील यांनी व्यक्त केला.बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २४ जानेवारीअखेर मुरगूडमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती मोहनराव गुजर होते. मुरगूड बॅँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.रणजित पाटील म्हणाले, स्पर्धेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शाहू कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके, अरुण नरके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील नामांकित मल्लांची नोंदणीसुद्धा झाली आहे.यावेळी स्पर्धा संयोजनाच्या महत्त्वाच्या सूचना माजी सरपंच शिवाजीराव पाटील, अर्जुन मसवेकर, प्रकाश एकल, मधुकर करडे, राजेंद्र लाडगावकर, आदींनी मांडल्या.बैठकीस मुरगूडच्या नगराध्यक्षा माया चौगले, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, संतोषकुमार वंडकर, जगन्नाथ पुजारी, सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, संजय मोरबाळे, बजरंग सोनुले, शिवाजी इंदलकर, किरण कुंभार, सुधीर सावर्डेकर, दौलतवाडीचे सरपंच शोभा जाधव, पांडुरंग पुजारी, राजू चव्हाण, दिग्विजय पाटील, अनिल शिंदे, पृथ्वीराज कदम, आदी उपस्थित होते. लाल आखाड्याचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)