शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटकने पाण्यासाठी करार करावा : कदम

By admin | Updated: March 13, 2016 23:27 IST

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सीमेलगतच्या एकमेकांच्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला असला तरी, कायमस्वरुपी उन्हाळ्यात असा पुरवठा करण्याबाबत दोन्ही राज्यांनी करार करावा. याबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन याबाबत धोरण ठरवावे, असे मत माजी मदत व पुनर्वसनमंत्री आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमेलगतच्या दुष्काळी गावांना तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळणार आहे, तर कर्नाटकातील गावांना काळमवाडी आणि वारणेतून पाणी दिले जाणार आहे. याबाबत अद्याप कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र दरवर्षी हा विषय उपस्थित होण्यापेक्षा कायमचेच पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात यावे. यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि करार करावा. करार झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्याची शक्यता आहे. दुष्काळी उपाययोजना करताना शासनाला जेवढा खर्च येतो, तो खर्च पाणी योजनांच्या वीज बिलापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने टंचाईतून वीज बिल भरून हा प्रश्न मार्गी लावावा. याच गोष्टीचा विचार करून आघाडी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये पाणी योजना प्रभावीपणे राबवून दुष्काळी भागाला दिलासा दिला होता. सध्याचे शासन दुष्काळी प्रश्नावर गंभीर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातूनच नव्हे, तर सांगली जिल्ह्यातील दुष्काळी लोकही स्थलांतराच्या स्थितीत आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य सरकारने ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)