लोकमत न्यूज नेटवर्क
दत्तवाड : कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे कर्नाटक राज्याने सीमाभागात सुरू केलेले रस्ते पुन्हा बंद केले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील दानवाड-एकसंबा दरम्यान असणाऱ्या दुधगंगा नदीवरील पुलावर मुरूम व काटेरी झाडे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारकडून महाराष्ट्राच्या सीमा सील केल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक रविवारी दुपारपासून बंद करण्यात आली आहे. दानवाड-एकसंबा हा रस्ता बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. पुढील एक आठवडा हा मार्ग बंद राहणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील दानवाड-एकसंबा मार्ग कर्नाटक शासनाने काटेरी झुडुपे व मुरुम टाकून वाहतुकीसाठी बंद केला आहे.