फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०१
ओळ - कोल्हापुरातील पूरग्रस्त भागात पूर ओसरल्यानंतर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरु केली. छाया नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०२
ओळ - कोल्हापुरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे, त्या भागात जेसीबीच्या सहाय्याने तो उचलला जात आहे. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०३
ओळ - कोल्हापुरातील एक दुकानदार आपल्या कुटुंबासह दुकान व दुकानासमोर परिसर मंगळवारी स्वच्छ करत होता. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०४
ओळ - कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरात राज्य विद्युत वितरण कंपनीचे शेकडो कर्मचारी खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०५
ओळ - जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या उद्योग भवनातील फर्निचर महापुराच्या पाण्यात अडकले होते. मंगळवारी कर्मचाऱ्यांनी ते स्वच्छ धुवून वाळत ठेवले होते. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०६/ ०७
ओळ - महापुरात नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भंगार व खराब झालेले साहित्य रस्त्यावर आणून टाकले जात असून ते गोळा करण्यासाठी भंगार विक्रेत्यांची गडबड उडाली होती. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०८
ओळ - रमणमळा परिसरातील पूरग्रस्तांनी आपले संसार सावरले आहेत, मंगळवारी एक महिला या महापुरातून वाचलेल्या प्रापंचिक साहित्याची स्वच्छता करत होती. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - २७०७२०२१-कोल-महापूर कोल्हापूर०९
ओळ - कोल्हापुरातील पूरग्रस्त भागातील रस्त्यावर पूर ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात गाळ, चिखल साचून राहिला आहे. महापालिका कर्मचारी रस्ते स्वच्छ करत आहेत, परंतु अशा रस्त्यावर जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेकांच्या दुचाकी घसरुन अपघातही झाले. छाया : आदित्य वेल्हाळ