शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

महालक्ष्मी यात्रेची उद्यापासून सुरूवात

By admin | Updated: May 4, 2015 00:55 IST

गडहिंग्लजमध्ये भक्तिमय वातावरण : तीन दिवस चालणार ; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

गडहिंग्लज : अमाप उत्साहात शनिवारपासून येथील श्री महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली असून ५ ते ७ मे हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत. त्यासाठी नागरिकांसह यात्रा कमिटी आणि प्रशासन व्यवस्था सज्ज झाली आहे. यात्रेसाठी गडहिंग्लज तालुक्यासह सभोवतालच्या आजरा, चंदगड, भुदरगड, कागल व कर्नाटकातील सीमाभागातून खासगी, दुचाकी व चारचाकी वाहनाने अंदाजे ८ ते १० लाख भाविक येतील, असा यात्रा कमिटीसह प्रशासनाचा अंदाज आहे. शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊन नागरिक व पादचारी यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहराबाहेर पार्किंगसह शहरातील मार्ग आवश्यकतेनुसार एकेरी, तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद केले आहेत, तर बंदोबस्तासाठी शीघ्र कृती दल, वाहतूक शाखेच्या पोलिसांसह अन्य पोलिसांची जादा कुमक असेल. संकेश्वर ते आजरा रस्त्यावर हॉटेल साई प्लाझा ते चर्चरोडपर्यंत एकेरी वाहतूक. मुसळे कॉर्नर ते हॉटेल साई प्लाझापर्यंत एस.टी.करिता दुहेरी वाहतूक. वडरगे रोडवर मुसळे कॉर्नर ते टेलिफोन एक्स्चेंजपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. कडगाव रोड शासकीय विश्रामगृह ते मुसळे कॉर्नर एकेरी वाहतूक. चर्च रोड आजरा रोड कॉर्नर ते भगवा चौक कडगाव रोडपर्यंत एकेरी वाहतूक. भडगाव रोडवर दसरा चौक ते संजीवनी हॉस्पिटलपर्यंत दुहेरी वाहतूक. आजरा रोड राधाकृष्ण मंदिरापासून भडगाव रोड हॉटेल यशोनंदापर्यंत रिगरोडवर एकेरी वाहतूक. भडगाव रोड संजीवनी हॉस्पिटल ते अयोध्यानगर बसथांब्यापर्यंत एकेरी वाहतूक. संकेश्वर रोड हॉटेल साईप्लाझा ते मराठा चित्रमंदिर भडगाव रोड रिंगरोड वरून एकेरी वाहतूक. वीरशैव चौक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते शिवाजी चौक, नेहरू चौक ते रंजनीगंधा चौक सर्व प्रकारचे वाहनांस प्रवेश बंद. भडगाव रोड शिवसागर हॉटेल ते देसाई हॉस्पिटल आणि तारा नर्सिंग होम, देसाई हॉस्पिटल ते आर्या किराणा दुकान कुंभार गल्लीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी आहे. दरम्यान, यात्राकाळात प्लास्टिक द्रोण, पत्रावळ्या, आदींचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तो इतरत्र पसरू नये यासाठी नगरपरिषदेतर्फे वाटण्यात आलेल्या कॅरीबॅगचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)