शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

महालक्ष्मी यात्रेस अमाप उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: May 3, 2015 01:11 IST

गडहिंग्लजमधील यात्रोत्सव : भव्य मंगल कलश मिरवणूक; दर्शनासाठी गर्दी

गडहिंग्लज : गडहिंग्लज निवासनी श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त हजारो सुवासिनींनी शुक्रवारी सकाळी शहरातून मंगलकलश मिरवणूक काढली. दुपारी पारंपरिक पद्धतीने इरडे पडण्याचा कार्यक्रम व ग्रामदैवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. अमाप उत्साहात निघालेल्या अभूतपूर्व मंगलकलश मिरवणुकीनेच देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजता हिरण्यकेशी नदीघाटावर सुवासिनी उत्स्फूर्तपणे एकत्र जमल्या. वरदायी हिरण्यकेशी नदीचे जल भरलेल्या मंगलकलशांची पूजा झाली. त्यानंतर निघालेल्या सवाद्य मिरवणुकीत ‘होणार सून मी या घरची’ या दूरदर्शन मालिकेतील ‘बेबी अत्या’च्या भूमिकेतील पौर्णिमा तळवलकर याही डोक्यावर मंगलकलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. नदीवेस, शिवाजी चौक, बाजारपेठ, बसवेश्वर चौक, मेन रोड, कांबळे तिकटी, आयलँड, लक्ष्मी रोड मार्गे मिरवणूक मंदिराच्या आवारात आली. देवीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सुवासिनींची ओटी भरण्यात आली. अभिनेत्री तळवलकर यांच्याहस्ते मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. पारंपरिक ‘पी-डबाक’सह कापशी माद्याळ येथील लेझीम पथक, अकिवाट येथील अविनाश झांजपथक, कागवाडच्या अमर बॅण्ड कंपनीने मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणुकीत नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, श्रद्धा शिंत्रे, डॉ. मंगल मोरबोळे, अश्विनी मगदूम, यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, देवी लक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांच्यासह पंचमंडळी, हक्कदार व मानकरी सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त महालक्ष्मी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)