शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली देवी उत्सव साधेपणाने, आजचा पालखी सोहळाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

श्री करवीर क्षेत्र माहात्म्य तसेच पौराणिक ग्रंथातून श्री महाकाली देवाचे वर्णन केले आहे. करवीर क्षेत्री आसुरांनी उन्माद मांडला होता, ...

श्री करवीर क्षेत्र माहात्म्य तसेच पौराणिक ग्रंथातून श्री महाकाली देवाचे वर्णन केले आहे. करवीर क्षेत्री आसुरांनी उन्माद मांडला होता, तेव्हा महाकाली देवीने श्री अंबाबाईच्या साक्षीने आसूरांचा वध केला करून भाविकांचे रक्षण केले होते. या देवीचे पौराणिक व प्राचीन मंदिर साकोली कॉर्नर परिसरात आहे. अनेक वर्षांपासून या मंदिरात महाकाली देवीचा उत्सव होत आहे. अक्षय तृतीयापासून हा उत्सव सुरू होऊन तो नवमीला पालखी सोहळ्याने समाप्त होतो.

यंदा देवीच्या उत्सवातील पारंपरिक धार्मिक विधी रद्द करण्यात आले आहेत. नित्याेचाराप्रमाणे अष्टमीच्या दिवशी देवीला गुरुवारी सकाळी महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा बांधण्यात आली. ही पूजा ओंकार गुरव यांनी बांधली. दुपारी बारा वाजता महाआरती होऊन देवीला पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी पार पडले. नवचंडी यज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

प्रतिवर्षी उत्सवात नवमी दिवशी सायंकाळी पाच वाजता महाकाली देवीचा पालखी सोहळा होता. या सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात; परंतु यावर्षी आज, शुक्रवारी होणारा हा सोहळाच रद्द करण्यात आला आहे. फक्त नियमानुसार पालखी पूजन होणार आहे.

सूचना - फोटो स्वतंत्र दिला आहे