शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’मध्ये महाडिकांचे ४० टॅॅकर

By admin | Updated: April 22, 2015 00:52 IST

सतेज पाटील : उत्पादकांपेक्षा स्वत:च्या व्यवसायासाठीच सत्तेची हाव

कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या हिताचा डांगोरा पिटणाऱ्या महादेवराव महाडिक यांचे ‘गोकुळ’मध्ये ४० टँकर आहेत. त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांच्या मिळकतीसाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा गंभीर आरोप राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे नेते, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कोल्हापूर आईस अ‍ॅन्ड कोल्ड स्टोरेज कोणाच्या पत्नीच्या मालकीचे आहे, हे जगजाहीर असून दूध उत्पादकांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्यांचे पितळ उघडे पडले असल्याचे सांगत सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर, इचलकरंजीसह शेजारी परिसरात दुधाची मागणी जास्त असताना मुंबईलाच पाठविण्याचा अट्टाहास का? टँकर भाडे व वितरण कमिशनच्या लोण्यापोटी उत्पादकांचे लाखो रुपये उडविण्याचे काम सुरू आहे. संचालकांचा वाहनखर्च चार कोटी आहे, दरवाढ झाल्यानंतर पंधरा दिवसांनी अंमलबजावणी करायची, अशा अनेक गोष्टींबाबत ‘एनडीडीबी’ ने वारंवार सूचना केल्या आहेत, पण लेखापरीक्षणासह सर्व सूचना केराच्या टोपलीत टाकून गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम या मंडळींनी केले. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केल्याने संघाची भरभराटी झाली. ब्रँड तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे पण नंतरच्या काळात जे ‘कारभारी’ म्हणून आले त्यांच्याकडून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठीच संघाचा वापर केला. ‘अमूल’चा विकास पाच वर्षांत दुप्पट झाला पण ‘गोकुळ’चा का नाही. सत्ताधाऱ्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी आम्ही पॅनेल केले. स्वत:हून लोक येऊन पाठिंबा देत आहेत, हे पाहता यश निश्चित मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्था संगणकीकृत पण संघ‘गोकुळ’ दूध संघाच्या संलग्न प्राथमिक दूध संस्था संगणकीकृत झाल्या, पण दूध संघ अद्याप पूर्णपणे संगणकीकृत केला नाही. यामागेही मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. नितळ दुधाची कमाई कोणाच्या खिशात संस्थांकडून आलेल्या कॅनमधील दूध ओतून घेतल्यानंतर दररोज ६ हजार लिटर दूध शिल्लक (नितळ) राहते. हे दूध कुठे जाते, याचा हिशेब कोणाच्या खिशात जातो, याचे उत्तर सत्ताधारी मंडळी देणार का? असा सवाल पाटील यांनी केला. दादांचे स्वागतसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लेखापरीक्षण अहवालानुसार चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.