शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक विजयी; मंडलिकांना धक्का

By admin | Updated: May 17, 2014 00:38 IST

कोल्हापूर : अत्यंत चुरशीने व उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत कोल्हापूर मतदारसंघातून राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय भीमराव महाडिक हे ३३ हजार २५९ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले.

कोल्हापूर : अत्यंत चुरशीने व उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत कोल्हापूर मतदारसंघातून राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय भीमराव महाडिक हे ३३ हजार २५९ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा त्यांनी पराभव केला. गेली १६ वर्षे लोकसभेत निर्विवाद प्रतिनिधित्व केलेल्या आणि गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून येत आपली राजकीय ताकद सिद्ध करणार्‍या मंडलिक गटाला पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. कोल्हापूर मतदारसंघात झालेल्या एकूण १२ लाख ६० हजार २९८ मतदानापैकी राष्टÑवादीच्या महाडिक यांना ६ लाख ०७ हजार ६६५, तर शिवसेनेच्या मंडलिक यांना ५ लाख ७४ हजार ४०६ मते मिळाली. देशभरातील मोदी लाटेत कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचा दारुण पराभव होत असताना कोल्हापूरच्या जनतेने मात्र राष्ट्रवादीला पसंत केले. गेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणार्‍या खा. मंडलिक यांना कोल्हापूरच्या जनतेने निवडून दिले होते. मात्र, त्याच जनतेने या निवडणुकीत मंडलिक कुटुंबातील सदस्याला पराभवाचा धक्का दिला. कॉँग्रेस आघाडी विरोधात वातावरण असतानाही धनंजय महाडिक यांच्या लोकोपयोगी समाजकार्य, लोकसंग्रह, युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचे जाळे, भागीरथी महिला मंडळाच्या माध्यमातून केलेले महिलांचे संघटन आणि थेट मतदारांशी संवाद साधल्यामुळे राष्टÑवादीला विजय मिळविणे सोपे झाले. याचबरोबर कॉँग्रेस, राष्टÑवादी, आरपीआय, जनसुराज्य, आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचाही राष्टÑवादीच्या विजयाला हातभार लागला. महाडिक यांच्या विजयात करवीर, राधानगरी व कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचा मोठा वाटा राहिला. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके प्रतिनिधित्व करीत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना तब्बल ३४ हजार ५७९ एवढे मताधिक्य मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. महाडिक यांच्या मदतीला राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतदारही धावून गेल्याचे स्पष्ट झाले. गतवेळच्या निवडणुकीत राधानगरी मतदारसंघाने खा. मंडलिक यांच्या पदरात भरभरून मते टाकली होती. मात्र, यावेळी मतदारांनी मंडलिकपुत्राला मोठ्या फरकाने डावलले. महाडिक यांना या मतदारसंघात २३ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंडलिक यांना १९ हजार ६५७ इतके मताधिक्य मिळाले. कागल मतदारसंघातही मंडलिक यांनी ९१४६ एवढे मताधिक्य घेतले. कोल्हापूर उत्तरमधून मंडलिक यांना अवघे ३८८५चे मताधिक्य मिळाले. दक्षिण मतदारसंघात मात्र धनंजय महाडिक यांना अपेक्षेइतके मताधिक्य मिळाले नाही. सतेज पाटील यांचा हा मतदारसंघ असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील, महाडिक आपापसातील राजकीय वैरत्व संपवून दोघे मतदारांसमोर गेले होते. मात्र, ते मतदारांना रुचले नसल्याने केवळ ९१४६ एवढे मताधिक्य येथे मिळाले. ‘शेकाप’चे संपतराव पवार पाटील (१३१६२), भारिप बहुजन महासंघाचे अतुल दिघे (७०६७), ‘आप’चे नारायण पोवार (५४९५) यांचा दारूण पराभव झाल्याने त्यांना अनामत रक्कमही गमवावी लागली. (प्रतिनिधी)