शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक समर्थकांचे कोल्हापुरात प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:29 IST

कोल्हापूर : कागलच्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांचे भाषण आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी रोखल्याचे पडसाद सायंकाळी मुस्कान लॉनमध्ये ...

कोल्हापूर : कागलच्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांचे भाषण आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी रोखल्याचे पडसाद सायंकाळी मुस्कान लॉनमध्ये झालेल्या सभेत उमटले. या सभेत महाडिक समर्थकांनी त्यांचा जयघोष केला. त्याबद्दल पक्षाचे नेते अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय महाडिक यांनीही समर्थकांना तराटणी दिली.खासदार महाडिक यांचे समर्थक सभास्थळी दोन्ही बाजूला होते. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खासदार पुत्र पृथ्वीराज महाडिक यांच्या समवेत पन्नासभर कार्यकर्ते उभे होते. सभा सुरू झाल्यापासूनच त्यांच्या घोषणा सुरू होत्या. ‘कुठं बी हुडिक..मुन्ना महाडिक...’,‘कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहात नाही..’, ‘एकच खासदार मुन्नासाहेब...’, ‘आवाज कुणाचा.. मुन्नासाहेबांचा’, अशा घोषणांनी व शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला होता.महाडिकांच्या भाषणावेळीही घोषणा सुरू राहिल्या. या घोषणा देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कार्यकर्ते मात्र शांतपणे पाहात होते. त्यावेळी आमदार मुश्रीफदेखील उपस्थित होते.अजित पवार बोलायला उभे राहिल्यावर त्यांनी सुरुवातीलाच मला शिट्ट्या आणि घोषणा दिलेल्या चालणार नाहीत. योग्य उमेदवार देण्याची पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे सभा ऐकावी, अशी तराटणी दिली. त्यानंतर घोषणा बंद झाल्या.मुंडे यांनीही ठेवले बोटधनंजय मुंडे यांच्या भाषणावेळीही महाडिक समर्थक घोषणा देत होते. त्यावर त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, सध्या टीव्हीवर शंभुराजेंची मालिका लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सुरू असताना मध्येच जर जाहिरात आली तर लोकांना त्याचा त्रास होतो. तसे तुमच्या घोषणांचे सुरू आहे, ते बंद करा.