शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘महाडिक, पी. एन. यांच्यासह १८ माजी संचालकांनी मांडली बाजू

By admin | Updated: October 1, 2015 00:58 IST

जिल्हा बँक गैरव्यवहार : चौदाजणांनी केले लेखी म्हणणे सादर; पुढील सुनावणी १४ आॅक्टोबरला

कोल्हापूर : आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, सतेज पाटील यांच्यासह १८ माजी संचालकांच्यावतीने वकिलांनी बुधवारी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर आपली बाजू मांडली. मंत्रालयात झालेल्या सुनावणीत काही संचालकांनी लेखी म्हणणे सादर केले, तर काहींचे म्हणणे सादर होऊ शकले नाही. याबाबत पुढील सुनावणी १४ आॅक्टोबरला होणार आहे. जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने सहकार मंत्र्यांकडे याबाबत सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते; पण गेले तीन महिने सुनावणीची प्रक्रिया ठप्प होती. अखेर सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे बुधवारी सुनावणी झाली. त्यामध्ये आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील, पी. एन. पाटील, अरुण नरके, संदीप नरके, एस. आर. पाटील, अमर पाटील, आदी १८ माजी संचालकांच्यावतीने अ‍ॅड. लुईस शहा यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर बाजू मांडली. टी. आर. पाटील यांच्यासह चौदा संचालकांच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले. (प्रतिनिधी)बाराजण नोटिसाविनाचसहकार मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या; पण माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह बाराजणांना नोटिसाच मिळाल्या नसल्याने त्यांचे म्हणणे सादर होऊ शकले नाही. बुधवारीच सहकार मंत्र्यांनी सर्वांना नोटिसा काढून त्या लागू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना दिले. शहा यांचा युक्तिवादचौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित संचालकांच्या माघारी बॅँकेतून पुरावे गोळा केले. आॅडिट रिपोर्टच्या अगोदर पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी न करता १९९८ पासूनच्या कामकाजाची चौकशी करण्यात आली. ज्या २८ थकबाकीदार संस्थांच्या कर्जासाठी संबंधित संचालकांना जबाबदार धरण्यात आले. त्या संस्था थकीत असल्या तरी त्यांची वसुलीची प्रक्रिया थांबलेली नाही. कर्जाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. थकीत रक्कम वसूल होणारच नाही, असे निष्पन्न झाले नसल्याने संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई करणे उचित नाही. चौकशीचा अहवाल साठ दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असताना सचिन रावळ यांनी ३१ जून २०१४ ला चौकशीचे कामकाज पूर्ण केले आणि २३ जानेवारी २०१५ ला अहवाल सादर केला. ही प्रक्रियाच चुकीची असल्याचे अ‍ॅड. लईस शहा यांनी युक्तिवादात दावा केला. माझ्याकडील चौदा संचालकांचे लेखी म्हणणे सहकार मंत्र्यांकडे सादर केले. याबाबत १४ आॅक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. - शिवाजीराव चव्हाण, वकील