कोल्हापूर : जिल्ह्णात कुठेही काही होऊ दे, विधानसभेच्या दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्याविरोधात भाजप, ताराराणी आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वांना एकत्र करून लढाई करणार असल्याची रोखठोक भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती सुरू असतानाच आमदार हसन मुश्रीफ आणि निरीक्षक दिलीप पाटील यांच्यादेखतच त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता हे जाहीरपणे सांगून टाकले. खा. महाडिक यांच्या या पवित्र्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. पक्षाची भूमिका हसन मुश्रीफ सांगत असताना, ‘दक्षिण विधानसभा मतदार संघात काय करणार’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मुश्रीफ यांनी माईक खासदार महाडिक यांच्या हातात दिला. यावेळी महाडिक यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. खासदार महाडिक म्हणाले, ‘ काँग्रेसच्याविरोधात एकच आघाडी करण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे. आमदार अमल महाडिक यांच्यासह अनेक नेते एकत्र येऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आपले काही उमेदवार रिंगणात असतील; परंतु उपलब्ध जागा आणि गटांची ताकद पाहून इतरांना तशा जागा दिल्या जातील. त्यामुळे ‘दक्षिणे’त राष्ट्रवादीची सोबत येतील त्या पक्षांशी आणि गटांशी युती असेल.आपण लपवून काहीही करत नसून उघडपणे या गोष्टी मांडत आहे. राष्ट्रवादीचेही काही उमेदवार त्यात असतील.’
सतेज यांच्याविरोधात महाडिकांचा शड्डू
By admin | Updated: January 20, 2017 01:19 IST