शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: August 3, 2016 16:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असून मदतकार्याचा आढावा घेतला.

 ऑनलाइन लोकमत

महाड, दि. ३ - मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा  सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला असून दोन बस व अनेक खासगी वाहने वाहून गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असून मदतकार्याचा आढावा घेतला. 
' मदत व शोधकार्य पूर्ण वेगाने सुरू बेपत्ता वाहने व प्रवाशांचा लवकरात लवकर शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून सक्षम अधिका-यांची नेणूक करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला हा पूल मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाहून गेला. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे पोलादपूर वरून महाड कडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे.  दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक रवाना झाले आहेत. या दोन्ही एसटी बसमध्ये 22 प्रवासी होते.  सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता.