शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत होणार ‘महाभरती’

By admin | Updated: August 10, 2016 01:11 IST

पी. शिवशंकर : २५ पदे सरळ सेवेद्वारे भरणार; अभियंत्याच्या १७ पदांचा समावेश

कोल्हापूर : एक-एक अधिकाऱ्यांकडे तीन-चार पदांचा कार्यभार असल्याने कामांचा उठाव म्हणावा तितक्या गतीने होत नाही, ही बाब लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यांत अधिकाऱ्यांची रिक्त असलेली २५ पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सरळ सेवा भरतीची परीक्षा अधिक पारदर्शक व्हावी म्हणून ‘महाआॅनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यांवर दोन-तीन खात्यांचा कार्यभार सोपवून त्यांच्यामार्फत कामकाज चालविले जात आहे; परंतु असे केल्याने कामाची निर्गत लवकर न होता ती प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाची गती मंदावली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्त शिवशंकर यांनी रिक्त असलेली अधिकाऱ्यांची ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ची पदे तसेच कनिष्ठ अभियंत्यांची पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे.कनिष्ठ अभियंता यांची १७ पदे भरली जाणार आहेत, तर कामगार अधिकारी, उपशहर अभियंता, पर्यावरण अभियंता, वर्कशॉप सहायक अभियंता, जनसंपर्क अधिकारी या पदांचाही त्यामध्ये समावेश आहे. सध्या प्रशासन या पदांसाठीची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा निश्चित करून स्थायी समितीकडून मान्यता घेण्याची प्रक्रिया पार पाडत आहे. महानगरपालिकेत बऱ्याच दिवसांनी महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भरली जात असल्याने भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली जावी, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून ‘महाआॅनलाईन’ या शासकीय यंत्रणेचा वापर करून ती घेण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज मागविण्यापासून ते परीक्षेपर्यंत आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रश्नपत्रिका मात्र महानगरपालिका प्रशासन तयार करेल. ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.सहायक आयुक्तपदाचा उमेश रणदिवे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांची रिक्त जागा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जाणार असून, नगरविकास विभागाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही सहायक आयुक्तपदाची जागा मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव ठेवायची असल्याने त्याच प्रवर्गातील अधिकारी द्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. के.एम.टी.साठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक पदासाठीही एक अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागितला आहे.