शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा

By admin | Updated: April 14, 2017 23:02 IST

राजू शेट्टी आक्रमक : ३३९ गावांमधून निघणार रॅली

कोल्हापूर : भाजपसोबत सत्तेत असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ४ मे रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्याआधी पाच दिवस स्वाभिमानीचे २०० युवक जिल्ह्यातील ३३९ गावांमधून रॅली काढणार असून, या पाच दिवशी रात्री शेट्टी यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून जाणार आहे. राजू शेट्टी जरी सत्तेत असले तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेत भाजप सरकारलाही टीकेचे लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी त्यांनी आता प्रत्यक्ष भूमिका घेतली आहे. कर्जमुक्ती बरोबरच, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा, शेतीपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, स्वामिनाथन कमिटीचा अहवाल त्वरित स्वीकारा यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून ३३९ गावांमधून ११५० किलोमीटरची ही रॅली काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि रविकांत तूपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे हे या सभांना उपस्थित राहणार आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि अन्य मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; परंतु अजूनही शासनाने याबाबतीत निर्णय घेतलेला नाही. आम्ही जरी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांची बाजू आम्हाला घ्यावीच लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे आणि तो ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलनेच होईल. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना