शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बालमित्रांनी गिरविले जादूचे धडे

By admin | Updated: May 20, 2015 00:10 IST

‘लोकमत बालविकास मंच’ची कार्यशाळा : जादूगार गुरुदास कदम यांनी शिकविले प्रयोग

कोल्हापूर : टिकल्यांची करामत, डान्सिकल बॉटल, कॉईन मॅनेज करणे, आदी जादूच्या प्रयोगांचे धडे मंगळवारी बालमित्रांनी गिरविले. निमित्त होते ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे आयोजित ‘तुम्हीसुद्धा होऊ शकता जादूगार’ या जादूच्या प्रयोगांची कार्यशाळा. यात जादूगार गुरुदास कदम यांनी बालमित्रांना जादू शिकविली.जादूचे प्रयोग पाहणे हा आबालवृद्धांसाठी मनोरंजन व आनंददायी अनुभव असतो. अनेक लहान मुलांना या प्रयोगांबाबत उत्सुकता असते. त्यांना ते शिकण्याचीही इच्छा असते. ते लक्षात घेऊन जादूचे प्रयोग शिकण्याची संधी ‘लोकमत बालविकास मंच’ने बालमित्रांना उपलब्ध करून दिली. कोल्हापुरात अशा स्वरूपातील कार्यशाळा पहिल्यांदाच झाली. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यशाळेचे उद्घाटन जादूगार गुरुदास कदम यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचे प्रतिमापूजन करून झाले. जादूगार गुरुदास कदम यांनी पहिल्यांदा ‘टिकल्यांची करामत’ ही जादू दाखविली. जादूच्या प्रयोगानंतर ते बालमित्रांना त्याची क्लृप्ती (ट्रिक्स) समजावून सांगत होते. ज्यांना ती क्लृप्ती समजत नव्हती, अशा मुला-मुलींमध्ये जाऊन, तसेच काहीजणांना व्यासपीठावर बोलावून ती क्लृप्ती ते परत दाखवीत होते. दीड तासाच्या कार्यक्रमात बालमित्रांना समजेल अशा पद्धतीने जादूगार कदम यांनी डान्सिकल बॉटल, पत्त्यांवर ग्लास अधांतरी ठेवणे, दहा रुपयांच्या नोटेपासून वीस रुपयांची नोट तयार करणे, कॉईन मॅनेज करणे, दोरीची दोन टोके धरून गाठ मारणे हे प्रयोग व त्यांच्या क्लृप्त्या दाखविल्या. उपस्थित मुला-मुलींनी हे प्रयोग, क्लृप्त्या वहीमध्ये लिहून घेतल्या. इतक्या सहजपणे जादूचे प्रयोग करता येतात, हे पाहून बालमित्र भारावून गेले. (प्रतिनिधी) हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे आयोजनखास ‘बालविकास मंच’च्या सदस्यांसाठी २७ व २८ मे रोजी हस्ताक्षर सुधारणा वर्ग आयोजित केला आहे. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ वाचत राहा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.