लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : १२४ वर्षांची परंपरा असलेल्या श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीला नावारूपाला आणून गोरगरिबांसाठी ज्ञानाची दालने खुली करणाऱ्या मदनलाल बोहरा यांचे शैक्षणिक कार्य उत्तुंग आहे, तसेच उद्योग, व्यापार, सहकार, धार्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, असे प्रतिपादन हरिनारायण पारीक-भोमजी (जोधपूर) यांनी केले.
येथील ना. बा. एज्युकेशन सोसायटीस भेटीप्रसंगी ते बोलत होते.
रामनिवास पारीक (नागपूर), संस्थेचे अध्यक्ष हरीष बोहरा यांनी मदनलाल बोहरा यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान राजकुमार व्यास, मनोहर पारीक, माधवप्रसाद व्यास, भंवरलाल व्यास, धीरज पारीक आदींचा सत्कार बोहरा यांनी केला. यावेळी मुख्याध्यापक एन. एम. घोडके, उपमुख्याध्यापक एस. एस. चिंचवाडे, उपप्राचार्य आर. जी. झपाटे, आर.एस.पाटील, एन.एस. पाटील, एस. एस. तेली, चंद्रशेखर शहा आदी उपस्थित होते.