शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाध्यक्षपदी मदन गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात शनिवारी (दि. १८) संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी पंतप्रधान ...

लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात शनिवारी (दि. १८) संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव डाॅ. विनय देव, वनविभागातील पुणे विभागाचे प्रमुख रंगनाथ नाईकडे, गोपीचंद कदम, राज्य न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे, धनर्वी कुलकर्णी, रमेश शिंदे, कोल्हापूर वारकरी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर, बापूसाहेब किल्लेदार, बाळकृष्ण महाराज गिरी, दत्तात्रय साठे, आदी उपस्थित होते. या संमेलनात जगभरातील संत साहित्याचे अभ्यासक, उपासक उपस्थित राहणार असल्याचे डाॅ. खांडगे आणि बाबा पाटील यांनी सांगितले. या संमेलनाची तारीख आणि ठिकाण लवकरच निश्चित केले जाणार आहे. कोरोना काळातही ‘संत साहित्याने दिलेली मनःशक्ती’ याविषयी विशेष परिसंवाद या संमेलनात होणार असल्याचे रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. संत साहित्याची संशोधन केंद्र जगभर सुरू व्हावीत, यासाठी विशेष कृतीयोजना आखणार असल्याचे विनय देव यांनी सांगितले.

मदन गोसावी यांची ओळख

मदन महाराज गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायकाची वाडी येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विधी शाखेतून त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी न्यायाधीश पदावर काम केले. मंत्रालयात विधी व न्याय खात्याचे सहसचिवपदी काम केले आहे. सध्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. उच्चपदस्थ अधिकारी असूनही महाराष्ट्रभर त्यांनी कीर्तन प्रवचनांतून जनजागृतीचे काम केले आहे. कायदेविषयक शिबिरांचे आयोजन, संतांच्या ग्रंथांचे वाचन व्हावे म्हणून त्यांनी गावोगावी ज्ञानेश्वरी व गाथा अभ्यासवर्ग सुरू केले आहेत.

फोटो (२४०९२०२१-कोल-मदन गोसावी (महाराज)