शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खंडग्रास चंद्रग्रहणाची उद्या रात्री पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 20:17 IST

कोल्हापूर : राज्यातील तमाम खगोलप्रेमींना उद्या, सोमवारी रात्री ११ पासून खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. कोल्हापुरातूनही जरी हे ग्रहण दिसणार असले तरी चंद्राचा फारच थोडा भाग पृथ्वीच्या छायेत येईल. रात्री १0 वाजुन ५0 मिनीटानी ग्रहणाला प्रारंभ होईल. मात्र ११ पासुन पुढे थोडी फार सावली दिसू लागणार आहे.अर्थात आकाशात ढग नसतील तरच पूर्ण ग्रहणाची मजा कोल्हापुरकर अनुभवी शकणार आहेत.

ठळक मुद्देरात्री १0 वाजुन ५0 मिनीटानी ग्रहणाला प्रारंभरात्री २ वाजून २0 मिनिटांनी मोक्षचंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत

कोल्हापूर : राज्यातील तमाम खगोलप्रेमींना उद्या, सोमवारी रात्री ११ पासून खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. कोल्हापुरातूनही जरी हे ग्रहण दिसणार असले तरी चंद्राचा फारच थोडा भाग पृथ्वीच्या छायेत येईल. रात्री १0 वाजुन ५0 मिनीटानी ग्रहणाला प्रारंभ होईल. मात्र ११ पासुन पुढे थोडी फार सावली दिसू लागणार आहे.अर्थात आकाशात ढग नसतील तरच पूर्ण ग्रहणाची मजा कोल्हापुरकर अनुभव शकणार आहेत.जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडते. ज्यावेळी पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा त्यास खग्रास चंद्रग्रहण म्हणतात तर जेव्हा चंद्राचा काही भाग झाकला जातो, तेव्हा त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात.

रात्र९ वाजून २0 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश करेल. इथून ग्रहणाचे वेध सुरु होतील. रात्री १0 वाजून ५२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल आणि ग्रहणाला सुरुवात होईल.

चंद्र हा सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या रेषेच्या किंचित वर चंद्र असल्याने पूर्ण चंद्रबिंब न झाकता पृथ्वीची सावली चंद्राच्या खालील भागावरुन पुढे सरकताना दिसेल. ही सावली डावीकडून उजवीकडे सरकेल. रात्री ११ वाजुन ५0 मिनिटानी ग्रहणाचा मध्य असणार आहे. यावेळी चंद्र्राच्या खालील बाजुचा साधारण २0 टक्के भाग पृथ्वीच्या छायेखाली येईल. तिथुन पुढे ही सावली हळू हळू उजवीकडे सरकेल आणि १२ वाजुन ४८ मिनीटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेतून बाहेर पडेल आणि मुख्य ग्रहण संपेल. रात्री २ वाजून २0 मिनिटांनी चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल आणि मोक्ष होईल.

हे ग्रहण महाराष्ट्रातून १ तास ५५ मिनिटे अनुभवता येणार आहे. अर्थात काळे ढग नसतील तरच. ग्रहण काळामध्ये चंद्रप्रकाशाची तेजस्विता 0.२५ असेल. भारतासहित हे ग्रहण आशिया, युरोप, आफ्रिया तसेच आॅस्ट्रेलिया येथूनही दिसू शकेल. यापुढील चंद्रग्रहण ३१ जानेवारी २0१८ आणि २७ जुलै २0१८ रोजी होणार आहे. दोन्ही खग्रास प्रकारचे ग्रहण आहेत.