शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी निष्ठा खुंटीवर

By admin | Updated: April 26, 2015 00:49 IST

सोयीचे राजकारण : सत्तेच्या वाटणीत कार्यकर्ते वाऱ्यावर

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षनिष्ठा व आपली तत्त्वे खुंटीला ठेवून सोयीचे राजकारण केले. बॅँकेत लागलेला डाग पुसण्यासाठी की केलेल्या कारभारावर पांघरूण घालण्यासाठी नेत्यांनी अशी मिटवामिटवीची खेळी केली. याबाबत संभ्रमावस्था असून, सत्तेच्या वाटणीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बॅँकेवर प्रशासक आले. विनातारण कर्जवाटप, वारेमाप खर्च यामुळे बॅँक ११/१ सेक्शनमध्ये गेल्याने बॅँकेबरोबर सभासदांचे मोठे नुकसान झाले. लाभांश न मिळाल्याने संस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासकांनी बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही बॅँक पूर्णपणे बाहेर आलेली नाही. तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागली. ज्यांच्या कारभारामुळे बॅँक अडचणीत आली, तीच मंडळी पुन्हा सत्तेसाठी पुढे आले. आजपर्यंत नेत्यांनी आपल्या भोवतीच राजकारण केल्याने ते कार्यकर्त्यांना संधी देऊच शकत नाहीत. या मंडळींबद्दल कमालीची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ नकोच, असा ठराव सभासदांनी केला होता. अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने सभासदांसमोर मते मागायला जायचे? असा प्रश्न सत्तारूढ गटाच्या नेत्यांसमोर होता. निवडणूक झालीच तर ती दोन्ही काँग्रेसमध्ये होणार आणि काँग्रेस अनियमित कामाबद्दल आपले वस्त्रहरण करणार, हे माहिती असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच सर्व मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत तडजोडीची भूमिका घेतली. जिल्हा बॅँकेची सत्ता सोडायची नाही, म्हणून राष्ट्रवादीने ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला बाय दिला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या माध्यमातून नवीन मोट बांधली होती. परंतु, एकाच निवडणुकीत त्यांनी तलवार म्यान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संजय मंडलिक यांनी संधी मिळते म्हटल्यावर कोणाचाही विचार न करता उडी मारली. आमदार चंद्रदीप नरके यांनीही ऐनवेळी रिंगणातून माघार घेऊन कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का दिला. अशा या नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत असून, याचे पडसाद आगामी सर्वच निवडणुकीत दिसणार, हे मात्र निश्चित आहे.