शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’अंतर्गत नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: July 12, 2017 00:52 IST

‘रेरा’अंतर्गत नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बांधकाम व्यवसायात अधिक पारदर्शकता यावी आणि ग्राहकहिताला प्राधान्य दिले जावे, या हेतूने १ मेपासून ‘राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा) हा कायदा लागू झाला आहे. कायदा लागू होण्यापूर्वीपासून बांधकाम सुरू असलेल्या; परंतु अद्याप अपूर्णावस्थेत असलेल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करण्यास कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत बांधकाम व्यावसायिकांतून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. क्लिष्ट प्रक्रिया, कायदा समजून घेण्यात होणारा उशीर, जीएसटी, आदी विविध कारणांनी नोंदणीस कमी प्रतिसाद मिळत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात किमान १२० ते १२५ इतक्या मोठ्या गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू असले तरी त्यातील प्रत्यक्षात पाच ते सहा प्रकल्पांचीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणीची शेवटची तारीख ही ३० जुलै असून, त्याच्या आत नोंदणी करणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक आहे. अन्यथा अशा गृहप्रकल्पांच्या विक्रीवर तसेच त्याची जाहिरात करण्यावर बंधने येणार आहेत. ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ हा बांधकाम व्यावसायिकांनी स्वीकारला असला आणि त्याचे स्वागत केले असले तरी दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३० जुलैपर्यंत सध्या बांधकाम सुरू असलेल्या परंतु अपूर्णावस्थेत असलेल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करणे काही तांत्रिक कारणांनी अडचणीचे बनले आहे. हा कायदा समजून घेण्यात वेळ जात आहे. नोंदणीची प्रक्रिया ही आॅनलाईन असल्यामुळे सर्व प्रकारच्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. कागदपत्रे असल्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. इंजिनिअर्स, आर्किटेक्ट आणि चार्टर्ड अकौंटंट्स यांची सांगड घालण्यासही वेळ लागत आहे. नुकत्याच लागू झालेल्या वस्तू व सेवा कराबाबतही संभ्रमावस्था आहे. शहरातील अपूर्ण असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांची नोंदणी तीन महिन्यांत करण्याचे बंधन आहे. तथापि, त्यातील अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मोजक्या गृहप्रकल्पांची नोंदणी पूर्ण झाली. उर्वरित प्रकल्पांची नोंदणी ३० जुलैपर्यंत करावीच लागणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले.