शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून कोल्हापुरात युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 21, 2017 13:13 IST

राजारामपुरीतील प्रकार : प्रकृत्ती चिंताजनक

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : कोल्हापुरात राजारामपुरी सातव्या गल्लीत मंगळवारी सकाळी बेशुध्द अवस्थेत युवती मिळून आल्याने खळबळ उडाली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिने विष प्राशन केल्याचे आढळताच पोलिसांनी शासकीय रुग्णवाहीकेतून तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. मंगल विठ्ठोबा निरुकेकर (वय २३ रा. माऊली पुतळा, राजारामपूरी, मुळ गाव तांब्याचीवाडी पैकी भटवाडी, ता. भूदरगड) असे तिचे नाव आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या पर्समध्ये ‘माणसाच जीवन, हे रांगोळीसारखे असते’ या शिर्षकाखाली प्रेमावर लिहलेली कवितेची चिठ्ठी मिळून आली. त्यावर मामाच्या घरचा पत्ता व मोबाईल नंबर होता. आत्महत्या करीत असलेचा उल्लेख मात्र तिने केला नव्हता. तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.

अधिक माहिती अशी, राजारामपुरी सातव्या गल्लीत रेड अ‍ॅन्ड टेलर या कापड दूकानाला लागून असलेल्या बोळात जिन्स पॅन्ट व शर्ट घातलेली युवती बेशुध्द अवस्थेत पडलेली फिरायला येणाऱ्या नागरिकांना दिसली. त्यांनी माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांना ही माहिती दिली. कवाळे यांनी घटनास्थळी येवून पाहिले असता युवती निपचित पडली होती. तिच्या शेजारी पर्स व विषाची बाटली पडली होती. त्यांनी राजारामपूरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस कॉन्स्टेबल अमल अवघडे, सिध्देश्वर केदार, प्रकाश पारधी, अर्चना जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवतीच्या तोंडातून उग्र वास येत होता. तिने विष प्राशन केल्याची खात्री होताच तिला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे मोबाईलवरुन तिच्या मित्र-मैत्रीणींशी पोलिस संपर्क साधत आहेत. तिचे वडील वन विभागात शिपाई आहेत. आई गृहिणी आहे. लहान भाऊ नववीला आहे. (प्रतिनिधी)

तीन दिवसांपासून बेपत्ता तिच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना बोलवून घेतले. चुलत मामा विठ्ठोबा रघुनाथ लाड यांच्याकडे ती राहते. ती बारावी पास असून गेल्या दोन महिन्यापासून ती कोल्हापूरात मामाकडे आली होती. राजारामपूरीतील जिनी अ‍ॅन्ड जॉनी या कापड दूकानात कामाला आहे. गेल्या तीन दिवसापासून कामावर जातो म्हणून बाहेर पडलेली ती घरी आलीच नव्हती. मामाने तिच्या गावी व नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता मिळून आली नाही. मंगळवारी ते राजारामपूरीत बेपत्ता वर्दी देणार होते, तो पर्यंत ती मिळून आली.