शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर, हनुमंतवाडी, नागदेवाडीत घरांच्या पडझडीत दीड कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोपार्डे : महापुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली असून, करवीर तालुक्यातील हणमंतवाडी, शिंगणापूर आणि नागदेवाडी या गावांनाही महापुरामुळे मोठा ...

कोपार्डे : महापुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली असून, करवीर तालुक्यातील हणमंतवाडी, शिंगणापूर आणि नागदेवाडी या गावांनाही महापुरामुळे मोठा तडाखा बसला आहे. गावात महापुराचे पाणी शिरल्याने घरांबरोबरच जनावरांच्या गोठ्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यात दीड ते पावणेदोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दि. २२ ते २४ जुलै या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे नागदेवाडी, शिंगणापूर आणि हणमंतवाडीत पाणी शिरले. २०१९ साली आलेल्या महापुरात या गावातील अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. जुजबी शासकीय मदत व कर्जे उचलून नव्याने डोक्यावर छत उभारुन या तीनही गावांमधील नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली होती. याच दरम्यान कोरोना महामारीमुळे रोजगार, शेती, दुग्धव्यवसाय आतबट्ट्यात आला. यातून सावरण्याचा आटापिटा सुरू असताना महापुराचे पाणी घरात घुसल्याने संसार पुन्हा महापुरात वाहून गेल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. नागदेववाडीतील १४ ते १५ घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून, ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हणमंतवाडीत २२ ते २३ घरांची पडझड झाली असून, ४ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. यात ५५ ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. शिंगणापूरमध्ये हीच अवस्था असून, येथे काही घरांची अशतः पडझड झाली असून, १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे.

चौकट

:

शासकीय अधिकारी केव्हा भेट देणार

शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या तीनही गावांना अजून कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. करवीर तालुक्यातील सधन व गुऱ्हाळ घरांचे माहेरघर म्हणून या तीन गावांचा नावलौकिक होता. पण सलग दोन वर्षे महापुराचा सामना करताना घरात पाणी आणि शिवारातील पिकांचा चिखल होत असल्याने डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

कोट : महापुरात निम्मे गाव पाण्याखाली गेले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. घरांचे छत उभे करण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी.

- योगेश ढेंगे, सरपंच, नागदेववाडी.

कोट : हणमंतवाडीत घरांची पडझड झाली आहेच. पण महापुराच्या पाण्यात गेली आठ दिवस पाणी असल्याने ऊसपीक कुजले आहे. संग्राम भापकर, सरपंच हणमंतवाडी

फोटो :२९ हणमंतवाडी नुकसान १) महापुराच्या पाण्यात ऊसपीकाचे नुकसान २)पाणी घरात शिरल्याने घरांची पडझड