शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘जीवनदायी’ची खासगी रुग्णालयांकडून लूट

By admin | Updated: October 4, 2016 00:57 IST

अभ्यागत समितीची बैठक : क्षीरसागर यांचा आरोप; कॅन्सर सेंटर उभारणीसाठी ‘टाटा’ व्यवस्थापनाशी चर्चा

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेत बराच गोंधळ असून, खासगी रुग्णालयांकडून शस्त्रक्रियेची गरज नसताना रुग्णांकडून लूट होत असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सीपीआरमध्ये झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत केला. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. सीपीआरमध्ये कॅन्सर सेंटर होण्यासाठी टाटा व्यवस्थापनाबरोबर लवकरच चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सीपीआरमधील कामकाजाचा आढावा घेताना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सिटी स्कॅन व ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्णत्वास आले आहे. जीवनदायी आरोग्य योजना, वर्ग - ४ ची १०४ रिक्त पदे, लोकसहभागातून यंत्रसामग्री मिळावी, शेंडा पार्क येथील बांधकाम, स्तन कर्करोग मोफत तपासणी अभियानाची माहिती दिली. वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करून सिटी स्कॅन व ट्रामा केअर सेंटरचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. जीवनदायी योजनेत प्रचंड गोंधळ आहे, खासगी रुग्णालयाकडून गरज नसताना शस्त्रक्रिया करणे, उपचार न करता अवाजवी खर्चाची बिले देऊन सरकारची फसवणूक सुरू आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अधिकृत पत्राची सक्ती करण्याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत सीपीआरसाठी सरकारकडून निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. अभ्यागत समितीचे सदस्य अजित गायकवाड, सुनील करंबे, सुभाष रामुगडे, डॉ. बसरगे, डॉ. काटकर, सिटी स्कॅनचे डॉ. संजय देसाई, डॉ. अजित लोकरे, डॉ. बडे, डॉ. मिसाळ, राजीव गांधी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे उपस्थित होते.सीपीआरमध्ये सोमवारी अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.