शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जाती-पातीची बंधने झुगारा : पाटील-बडदारे

By admin | Updated: September 8, 2015 23:53 IST

'स्पार्क लघुपट महोत्सव' : शिवाजी विद्यापीठात तरुणाईची गर्दी

कोल्हापूर : सुशिक्षित तरुणाईने समाजमनात खोलवर रूजलेली जाती-पातीची बंधने झुगारून दिली तरच एक आदर्श मानवतावादी समाजव्यवस्था आकाराला येईल, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या मंगला पाटील-बडदारे यांनी सोमवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभाग व अ‍ॅन अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रॉडक्शन्सतर्फे आयोजित ‘स्पार्क लघुपट महोत्सव-२०१५’च्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. मानव्यविद्या सभागृहातील या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. ज. रा. दाभोळे होते. मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी निर्भय उलस्वार याच्या ‘हुलड’ या आॅनर किलिंगवरील लघुपटाच्या प्रीमिअरने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. दाभोळे म्हणाले, आॅनर किलिंगच्या घटना म्हणजे भारतीय समाजाला लागलेले लांच्छन आहे. या प्रश्नांसंदर्भात विचार करत असताना त्याची उत्तरेसुद्धा असतात पण, ती मिळवायची की नाही, हा मात्र संपूर्णत: आपलाच प्रश्न आहे. कार्यक्रमात ‘हुलड’ लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. निर्भय उलस्वार यांनी आभार मानले. महोत्सवास अभिनेते मिलिंद ओक, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. सुमेधा साळुंखे , दीपक कुन्नुरे, अनुप जत्राटकर, प्रसाद ठाकूर, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. शिवाजी जाधव, राजश्री साकळे , धनंजय पोलादे, सुरेश पाटील, स्रेहलराज, शेखर गुरव, उमेश देवकर, जयेंद्र राणे, रणजित गायकवाड, चैतन्य गुजर, रणजित माने, संगीतकार रवींद्र सुतार, कलादिग्दर्शक सुंदरकुमार आदी उपस्थित होते. महोत्सवासाठी श्वेता किल्लेदार, सानिका मुतालिक, अभय उलस्वार, सागर सावंत, राहुल गडकर, दुर्वा दळवी, कविता राजपुरोहित यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) महोत्सवात विविध लघुपटांचे प्रदर्शनया महोत्सवात चैतन्य डोंगरे व सुशांत पाटील यांचा ‘चेतना’, महादेव कांबळे यांचा ‘अभंग काळोखाचा’, हरिष कुलकर्णी यांचा ‘अ गणेश उत्सव’, प्रसाद ठाकूर यांचा ‘चेस’ आणि अनुप जत्राटकर यांच्या ‘फिशी लाइफ’ व ‘स्मोकिंग झोन’ या लघुपटांचे प्रदर्शन झाले.