शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतीला पर्यटनाचा लूक

By admin | Updated: November 17, 2014 23:55 IST

संगणकप्रणालीचा वापर : केवळ दोन माणसांवर ८० एकर जमीन

प्रकाश पाटील-कोपार्डे -खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा विचार करता आज पारंपरिक शेती परवडेनाशी झाली आहे. उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसेना झाला आहे. पण, याच शेतीला आधुनिकतेची जोड आणि योग्य नियोजन केल्यास अल्प मनुष्यबळातही उत्कृष्ट पद्धतीने शेती करता येते. उत्पन्नही भरघोस मिळते. पन्हाळा तालुक्यातील बोरगावसारख्या दुर्गम भागात संगणक प्रणालीचा वापर करून अवघ्या दोनच मजुरांवर सुमारे ८० एकर जमीन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणी नरके घराण्यातील संदीप नरके हेच ते कृषीपंडित. त्यांनीच हा प्रकल्प राबविला असून, शेतीला पर्यटनाचा दर्जा देण्याचाही ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत. शंभर वर्षांपूर्वी बोरगाव भागातच त्यांच्या पूर्वजांनी शेतीसाठी ज्या यंत्रांचा वापर केला त्यांचेही जतन केले आहे.बोरगाव येथे नरके यांची १०० ते १२५ एकर जमीन आहे. यातील ८० एकर जमिनीमध्ये ऊस, केळी, भुईमूग, नाचणा या पिकांबरोबर जनावरांचा गोठा व नामशेष होत चाललेली आयुर्वेदिक फळझाडे व मसाल्यांचा झाडांचाही समावेश आहे. नरके यांनी अलीकडेच म्हणजे पाच वर्षांपासून शेती करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या एकूण शेतीमध्ये उसाचे क्षेत्र मोठे होते. पाण्याबरोबर वेळेच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन हाच पर्याय केला. त्यांनी ५३ बाय ५३ व १६ फूट खोल असे मोठे शेततळे निर्माण केले. तळ्यावर संपूर्णत: संगणकीय कार्यप्रणालीचा वापर केला. संगणकावर प्रोग्रॅम तयार करून केवळ एक व्यक्ती ३५ एकर क्षेत्रांवरील असणाऱ्या पिकांना पाणी देते. टाक्यांमध्ये खते टाकली जातात व पाणी सुरू असताना योग्यवेळी ही खते ठिबकमधून पिकांच्या मुळाशी जातात. त्यामुळे उघड्यावर पडणाऱ्या खतांचे हवेतच विघटन न होता त्याचा फायदा उत्पन्नवाढीवर झाल्याने एकरी ४० टनांनी उसाचे उत्पन्न वाढल्याचे नरके यांनी सांगितले.कृषी पर्यटन केंद्र निर्माण करण्यास संदीप नरकेंकडून सुरुवात संदीप नरके यांचे पणजोबा चंद्रोबा नरके यांनी शंभर वर्षांपूर्वी शेतात यांत्रिकीकरणास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे आजोबा डी. सी. नरके यांनीही शेतीमध्येयांत्रिकीकरण करत प्रगतशील शेती केली. त्यांनी पाणी खेचण्यासाठी वापरलेले १८७६ मध्ये तयार झालेले फिटर फिल्डिंग इंजिन (मेन इन इंग्लंड), ४० एचपी., यु. एस. आय. मेक-व्हिटा इंजिन - १५/१६ एच.पी, इस्टन इंजिन (लिंकन), ३६ एच. पी. यांसह तेलघाणा, हॉलर (भात व नाचणी कांडणीसाठी), २ चक्की ही यंत्रसामुग्री आजही चालू स्थितीत ठेवली आहेत. आज रस्त्यावर सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनसारखेच पण घोड्यांद्वारे ओढले जाणारे अ‍ॅडम्स लिनिंग व्हील ग्रॅँडर हे मशीनही चालू स्थितीत आहे. ७० वर्षांपूर्वीचा फोर्डसन (मेजर) कंपनीचा मोठा ट्रॅक्टरही चालू स्थितीत आहे. ही सर्व यंत्रसामग्री जोपासत आधुनिक यंत्रसामग्रीचा शेतीसाठी केलेला वापर याचे दर्शन भावी पिढीला व्हावे, यासाठी बोरगाव (ता. करवीर) येथील नरके कॅम्प ‘कृषी पर्यटन केंद्र’ म्हणून निर्माण करण्याचा मानस नरके यांनी व्यक्त केला आहे.भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या युवा पिढीने पुन्हा निसर्गाकडे यायचे झाल्यास शेती हाच मार्ग आहे. शास्त्रशुद्ध शेती कशी करावी, याचा अभ्यास करून प्रत्येक अडचणींवर मार्ग शोधत शेती व्यवसाय फायद्याचा कसा होऊ शकतो, हे एक आदर्श उदाहरण युवा पिढीच्या पुढे ठेवून शेतीत रमलो आहे.- संदीप नरकेशाळकरी मुलांसाठी ठरणार आकर्षणबोरगाव येथील ‘कृषी पर्यटन केंद्र’ म्हणून आकाराला येत असलेल्या नरके कॅम्पमध्ये किमान १०० शाळकरी मुलांना बसून मुंबईस्थित असणाऱ्या ‘तारांगण’च्या पद्धतीवर हॉल तयार केला आहे. यामध्ये तारांगणाच्या अनुभूतीबरोबर स्लाईड शोद्वारे पारंपरिक शेती, अत्याधुनिक शेती, हवामान बदलाचा परिणाम, रेन हार्वेस्टिंंग यांसह अन्य माहिती स्लाईड शोद्वारे देण्यात येणार आहे.ठिबकमुळे आठ दिवसांत एकरी सव्वापाच लाख लिटर पाण्याची बचत.पाटपद्धतीने पाणी दिल्यास एकरी ६ ते ७ लाख लिटर पाणी खर्ची पडते.पिकांच्या मुळाशी मदत करणाऱ्या सेंद्रिय खतांचाही समावेश करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.शेतातील ठिबक सिंचनच्या तांत्रिक बाजू संजय बुटाले यांनी निर्मिल्या आहेत.