शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीकडे ‘नॉलेज लाईफ’च्या दृष्टीने पाहा

By admin | Updated: December 26, 2014 00:10 IST

भारत खराटे : ‘लोकमत’ बाल विकास मंच, चाटे शिक्षण समूहातर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे केवळ ‘कॉलेज लाईफ’पूर्वीचा एक टप्पा म्हणून न पाहता, ‘नॉलेज लाईफ’मधील मूलभूत पायरी यादृष्टीने पाहा. एकाच अभ्यास पध्दतीचा अवलंब करा. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी ही पध्दत उपयुक्त ठरेल. सराव प्रश्नपत्रिकांवर भर द्या, असा कानमंत्र चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.‘लोकमत’ बाल विकास मंच आणि चाटे शिक्षण समूहातर्फे मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ‘दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी’ हा मार्गदर्शनाचा विषय होता.खराटे म्हणाले, दहावीच्या परीक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत. ऐनवेळी अभ्यास पध्दती न बदलता सुरुवातीपासून ज्या पध्दतीचा अवलंब केला आहे, तीच पध्दत अंतिम टप्प्यातही वापरली पाहिजे. प्रश्नपत्रिकांचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सरावामुळे काळ, काम आणि वेग याचे अचूक आकलन होईल. परीक्षेचे वेळापत्रक, पाल्याचे आरोग्य, शिक्षकांकडून पाल्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, याबाबत पालकांनी आपला वेळ दिला पाहिजे.चाटे शिक्षण समूहाच्या विविध उपक्रमांबाबत बोलताना खराटे म्हणाले, चाटे शिक्षण समूहांतर्गत ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले ग्रुप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबर मेडिकल, जेईई मुख्य आणि आयआयटी-जेईई (अ‍ॅडव्हान्स) आदी परीक्षांची तयारीही करुन घेतली जाते.चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य प्रशांत देसाई यांनी, दहावीमध्येच विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे कंटेंट क्लिअर करुन घेतल्यास जेईई, एआयपीएमटी व आयआयटीसाठी फायदा होईल, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. सर्जेराव राऊत, जिल्हा समन्वयक प्रा. सादिक मुजावर, प्रा. संतोष पाटील उपस्थित होते. प्रा. सचिन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पालकांचा सहभाग हवा यावेळी प्रा. खराटे म्हणाले की, आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनीही योगदान देणे आवश्यक आहे.परीक्षेचे वेळापत्रक, पाल्याचे आरोग्य, शिक्षकांकडून पाल्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, याबाबत पालकांनी आपला वेळ दिला पाहिजे.