शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीवर यंत्राद्वारे नजर

By admin | Updated: February 11, 2015 00:15 IST

विशेष संरक्षित क्षेत्रात कडक नियम-- पाण्याच्या स्रोतांचे समिती करणार आॅडिट

प्रकाश पाटील - कोपार्डे - पाण्याचा उपसा व भूजल पातळीची वाढ आणि घट यांच्या नोंदी वेळोवेळी घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर आलेखक व जलप्रमाण यंत्रे लावली जाणार आहेत. या यंत्रांमुळे प्रत्येक गावाची भूजल पातळी आणि त्यात किती घट किंवा वाढ झाली, हे कळणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून बांधकाम आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. याचा थेट परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर आणि भूजल पातळीची घट होण्यावर होतो. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भूगर्भातून पाण्याच्या होत असलेल्या अतिरिक्त उपशावर निर्बंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ हा कायदा १ जून २०१४ पासून राज्यात लागू केला. यातील तरतुदीनंतर पाण्याच्या पातळीच्या वेळोवेळी नोंदी घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर जलपातळी आलेखक यंत्र व जलप्रमाण ही दोन यंत्रे लावली जाणार असून, यंत्रामुळे प्रत्येक गावाची भूजल पातळी आणि त्यात किती घट व वाढ होते, हे सहज समजणार आहे.एकूणच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर लावण्यात येणाऱ्या दोन्ही यंत्रांमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे संवर्धन शक्य होईल. सध्या ही यंत्रे नसल्याने भूजल सर्वेक्षण विभागातर्फे प्रत्येक गावातील ठरावीक निरीक्षण करून भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जात होत्या; पण आता लावण्यात येणाऱ्या जलपातळी आलेखक व जलप्रमाण यंत्राद्वारे अचूक नोंदी घेणे शक्य होईल. मीटर टेपच्या साहाय्याने भूजल पातळी मोजण्याची पद्धतही कालबाह्य होणार असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे एखाद्याने पिण्याच्या पाण्याच्या संरक्षित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून विहीर किंवा बोअरवेलचे खोदकाम केल्यास त्यांच्यावर कारवाई करून खोदकामाचे साहित्य जप्त केले जाणार आहे. नोंदी घेण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी व पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीच्या सदस्यांची राहणार आहे. एखाद्या गावच्या भूजल पातळीत घट झाल्यास ती वाढविण्यासाठी व उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम समिती करेल.