शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशच्या बहाण्याने १४ तोळे दागिने लंपास

By admin | Updated: March 17, 2016 00:49 IST

इस्लामपुरातील घटना : चोरी होताच महिलेला भोवळ

इस्लामपूर : शहरातील महादेवनगर परिसरातील व्यापारी उदय देसाई यांच्या घरातून दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या आईच्या अंगावरील १४ तोळ्याचे दागिने लंपास केले. बिलवर, पाटल्या, चेन अशा साडेतीन लाखाच्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. याबाबत उदय आदिनाथ देसाई (वय ४९, रा. महादेवनगर, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता दुकानात आले. त्यावेळी घरी त्यांची आई व पत्नी होत्या. पावणेअकराच्या सुमारास मिश्र हिंदी भाषेत बोलणाऱ्या दोघांनी घरात प्रवेश करून आम्ही कंपनीचे कर्मचारी आहोत. पॉलिश पावडरचे वितरण करतो आणि सोने पॉलिश करून देतो, असे त्यांनी सांगितले. देसाई यांनी त्यांना दागिने आणून दिले. या पॉलिश पावडरमध्ये पाणी ओतून त्यामध्ये पिवळ्या रंगाची पॉलिशची पावडर टाकून त्या पाण्यात दागिने टाकले. या सगळ्या प्रक्रियेत हातचलाखी करीत या दोघा भामट्यांनी पाण्यातील दागिने चोरून स्वत:कडे घेतले आणि भांडे तेथेच ठेवून पोबारा केला. काही वेळाने श्रीमती देसाई यांना आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समजताच त्या भोवळ येऊन पडल्या.दागिने, भांडी पॉलिश होतात, तुमच्या अंगावरील दागिने तुमच्यासमोर पॉलिश करून देतो, असे सांगून देसाई यांच्या ७९ वर्षीय वृध्द आईचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर देसाई यांनी आपल्याकडील पाच तोळे वजनाच्या ४ बिलवर, ५ तोळे वजनाच्या २ पाटल्या आणि ४ तोळे वजनाची १ चेन असे १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने या भामट्यांकडे दिले. त्यांनी या घटनेची माहिती भाचा आशिष बर्डे याने दुकानात जाऊन उदय देसाई यांना दिली. देसाई यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, बापू कांबळे यांनी या परिसरातील एका हॉटेलमधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. मात्र, त्यामधून भामट्यांचा माग लागला नाही. (वार्ताहर)भामट्यांचे रेखाचित्र..!महादेवनगर परिसरात १४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या भामट्यांचे वर्णन श्रीमती देसाई यांनी सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित भामट्यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. घटनेतील भामट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.