शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकसभेच्या जोरबैठका शिवाजी पेठेतून श्रीगणेशा : मंडलिकांचे स्नेहभोजन तर महाडिकांची मिसळ पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:03 IST

प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील दोन्ही मातब्बर उमेदवारांनी ऐतिहासिक

कोल्हापूर : प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील दोन्ही मातब्बर उमेदवारांनी ऐतिहासिक शिवाजी पेठेतून जोरबैठकांना सुरुवात केली असून, त्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

आंदोलन असो की निवडणुकांच्या रणनीतीची पेरणी कोल्हापूर शहरातील पेठांतून केली की त्याचे लोन संपूर्ण शहरात पसरण्यास वेळ लागत नाही. त्यामुळेच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी शिवाजी पेठेत माजी महापौरांसह दिग्गज नेत्यांसमवेत स्नेहभोजनाचे आयोजन केले आणि प्रचाराची रणनीती ठरवली. या स्नेहभोजनाची बातमी जिल्ह्यात पसरली. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी सकाळी शिवाजी पेठेतील सव्वाशे प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत मिसळ पार्टीचे आयोजन केले.

पेठेतीलच एका हॉटेलमध्ये बसून मिसळवर ताव मारत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. काही तरुण मंडळे व तालीम मंडळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर पेठेतील माजी महापौर भिकशेठ पाटील, आनंदराव ठोंबरे, विक्रम जरग, बोंद्रे यांच्यासह अनेकांच्या घरी व परिसरातील दुकानांत जाऊन त्यांनी गाठीभेठी घेतल्या. गेले दोन दिवस त्यांनी भेटीगाठीचा कार्यक्रम राबविला असून, बुधवारी त्यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार महाडिक यांचा सत्कार अशोक जाधव, बबन कोराणे, बाजीराव चव्हाण यांनी केला.

यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, शिरीष कणेरकर, नगरसेवक किरण शिराळे, बबन कोराणे, विकी महाडिक, विश्वास पाटील, शरद तांबट, अशोक जाधव, तुकाराम इंगवले, उत्तम कोराणे, अजित राऊत, विश्वास कळके, गजानन जरग, आदी उपस्थित होते.कोल्हापूरच्या राजकारणात शिवाजी पेठेच्या पाठिंब्याला फारच महत्त्व आहे; कारण एकदा तिथे राजकीय हवा उठली की तिचे जिल्हाभर वादळ उठते म्हणून लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार पेठेत जाऊन जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी सकाळी असाच पेठेतील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत मिसळवर ताव मारला. यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक किरण शिराळे, शिरीष कणेरकर, बबनराव कोराणे, विकी महाडिक, विश्वास पाटील, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकElectionनिवडणूक