शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉनला नेतेमंडळींची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 20:35 IST

कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉनच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवर्जून भल्या पहाटे पोलीस मैदानावर धाव घेतली. या सर्वांनीच उपस्थित ...

कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉनच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवर्जून भल्या पहाटे पोलीस मैदानावर धाव घेतली. या सर्वांनीच उपस्थित स्पर्धकांची फोटो काढण्याची हौस भागविली. हजारोजणांनी या सर्व आपापल्या आवडत्या नेत्यांसमवेत फोटो काढून घेतले.इतक्या पहाटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांचा सहभाग पाहून, उपस्थित नेतेही अचंबित झाले. सुरुवातीला खासदार धैर्यशील माने यांनी मैदानावर हजेरी लावली. उपस्थितांशी गप्पाटप्पा करीत त्यांनी पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन स्पर्धा पूर्णही केली.यापाठोपाठ खासदार संभाजीराजे, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे सर्वजण आले. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारीत असताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी सर्वांच्या चर्चेचा सूर हाच होता की, आरोग्यविषयक जाणिवा वाढल्या असून, ‘लोकमत महामॅरेथॉन’मुळे आम्हा नेतेमंडळींनाही आता लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.या सर्वांच्या हस्ते विविध अंतरांच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्यानंतर बक्षीस वितरणाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले. त्यांच्यापाठोपाठ खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील हेदेखील आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कॉँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी कवठेकर यांचीही उपस्थिती होती.या सर्वांसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी जी झुंबड उडाली, ती पाहता अजूनही जनता आपल्या नेत्यांवर किती प्रेम करते, याची जाणीव यानिमित्ताने झाली. अनेक नेत्यांना अर्धा, पाऊण तास केवळ फोटोसेशनसाठी द्यावा लागला. ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांपासून ते कडेवर बाळ घेतलेल्या आईपर्यंत सर्वांनी आपल्या आवडत्या नेत्यांसमवेत फोटो काढून घेतले.