शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:00 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट काळजाला हात घालायचा; चौथा कोणताही आरोप बेधडकपणे करायचा, तर पाचवा बोलताना हसून-हसून मुरकुंड्या वळायच्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचाराचा धुरळा उडाला असताना बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे आणि पतंगराव कदम यांची उणीव नेते, कार्यकर्त्यांना भासत आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे जरी वय झाले होते तरी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आतुर असायचा. गेल्याच लोकसभेच्या आधी त्यांचे निधन झाले; परंतु आजही शिवसेनेच्या सभा होताना त्यांची आठवण निघते.विलासराव देशमुख यांचेही गेल्या लोकसभेच्या आधी म्हणजेच १४ आॅगस्ट २०१२ रोजी निधन झाले असले तरी आजही कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विद्यमान परिस्थितीमध्ये त्यांची उणीव जाणवते. आपल्या दिलखुलास स्टाईलमध्ये, मान हलवत खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत देशमुख जे बोलायचे, त्याचा प्रभाव पडायचा. हा माणूस बोलायला उभा राहिला की चित्रच डोळ्यांसमोर उभं करायचा. ‘रोजगार हमीवर काम करणाºया पोराला या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचं काम केवळ पवारसाहेबच करू शकतात,’ असे आपल्या स्टाईलमध्ये सांगून शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा मजबूत करण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे सांगणारे आर. आर. पाटील यांची म्हणूनच आज उणीव भासते. त्यांच्या बोलण्यातील सच्चेपणामुळेच कार्यकर्ते त्यांच्यावर फिदा असायचे.समोरचा विरोधक कितीही मोठा असो; त्याच्याबाबतीत बोलताना भीडभाड न ठेवणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. आपल्या रांगड्या शैलीमध्ये राज्यातील बहुजन समाजाला आवाहन करणारा हा नेता बोलत असताना ज्या पद्धतीने बोलत असायचा ती पद्धत कार्यकर्त्यांना आवडायची. ३ जून २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र आजही भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासतच असणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील दिलखुलास माणूस म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते पतंगराव कदम. त्यांचे निधन ९ मार्च २०१८ रोजी झाले. अन्यथा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेत, ‘एकमेकांची जिरविण्यामध्ये आमचीच जिरली आहे. आता ही जिरवाजिरवी पुरे झाली,’ असे सांगत पतंगरावांनी निश्चितच कॉँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचे कान टोचले असते यात शंका नाही.प्रचार शिगेला, चौफेर बोलणाऱ्यांची वानवासर्वच पक्षांकडे चौफेर बोलणाºया वक्त्यांची वानवा असल्याचे दिसून येते. जनतेची नस ओळखलेले, आपल्या शैलीने लाखोंच्या सभेला खिळवून ठेवणारे, मुद्द्यांची प्रभावी मांडणी करणारे प्रभावी नेते मोजकेच आहेत. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासतच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक