शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

Lok Sabha Election 2019 कडक उन्हात, प्रचार तापला ! उद्या सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:52 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले आहे. प्रचारफेऱ्या, गाठीभेटी, जोडण्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून हवा करण्याचा प्रयत्न असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत धुरळा उडाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत थेट दुरंगी लढत होत असल्याने प्रचारातही कमालीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. मंगळवारी (दि. २३) दोन्ही मतदारसंघांत मतदान होत असून त्यासाठीचा जाहीर प्रचार उद्या, सायंकाळी सहा वाजता बंद करावा लागणार आहे. दोन दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ करावी लागणार आहे. या अगोदर जरी प्रचाराचे एक-दोन टप्पे झाले असले तरी शेवटी मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. गावागावांत पदयात्रा काढून हवा करण्याची जबाबदारी उमेदवारांनी स्थानिक नेत्यांवर दिली आहे.पालकमंत्र्यांचे आज सहा मेळावेपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी शहरात विविध ठिकाणी सहा मेळाव्यांचे आयोजन केले आहे.शनिवारी सकाळी ९ वाजता राजारामपुरी मुख्य रस्त्यावर पदयात्रा होणार असून, १0 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय बेलबाग मंगळवार पेठ, ११ वाजता लोळगे लॉन फिरंगाईजवळ वाजता इंद्रायणी सांस्कृतिक हॉल रंकाळा टॉवरजवळ, दुपारी १ वाजता नष्टे मंगल कार्यालय, महावीर गार्डन जवळ, २ वाजता त्र्यंबोली मंगल कार्यालय, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसमोर, सदर बझार या ठिकाणी मंडलनिहाय हे मेळावे होणार आहेत.शेवटच्या जोडण्यांसाठी टोकाचे प्रयत्नलोकसभा निवडणुकीत चुरस अनेक वेळा आपण पाहिली; पण इतकी ईर्षा कधीच नव्हती. काठावरची लढत असल्याने शेवटच्या टप्प्यात जोडण्यांसाठी दोन्ही बाजूंनी टोकाचे प्रयत्न सुरू आहेत.सोशल मीडियाच्या हत्याराला ‘धार’या निवडणुकीत जाहीर सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सोशल मीडियातून एकमेकांवर वार करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडलेली नाही. शेवटच्या टप्प्यात या माध्यमाचा प्रभावी ‘हत्यार’ म्हणून वापर करण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी उमेदवारांचे स्वतंत्र पथक असून एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत मतदारांत संभ्रम व बदनामी करून मत परिवर्तनाची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. जाहीर प्रचार जरी बंद झाला तरी मतदानापर्यंत हे ‘हत्यार’ उमेदवारांच्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक