शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ‘पोस्टल’ वेळेत न दिल्यास राहावे लागणार मतदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 14:02 IST

निवडणुकीची ड्यूटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांकरिता पोस्टल मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोस्टल मतदानाचे फॉर्म भरून द्यावेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधितांना इशारा पोलिसांसह निवडणूक ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : निवडणुकीची ड्यूटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांकरिता पोस्टल मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोस्टल मतदानाचे फॉर्म भरून द्यावेत.

ते विहित वेळेत न मिळाल्यास स्वीकारले जाणार नाहीत, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी (दि. ३०) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिला. पोस्टलचे फॉर्म वेळेत न दिल्यास संबंधितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसह मतदार जागृती असे विविध कार्यक्रम आतापर्यंत घेण्यात आले.

तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसह निवडणुकीची ड्यूटी बजावणारे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. निवडणुकीच्या कामानिमित्त पोलीस व निवडणुकीतील कर्मचारी बाहेरगावी जातात; त्यामुळे मतदानाचा हक्क बजावताना अडचणी होतात. यासाठी आतापासूनच पोस्टलचे फॉर्म घेऊ न ते लवकरात लवकर निवडणूक विभागाकडे सादर करावेत. जेणेकरून नंतर धावपळ होणार नाही. हे फॉर्म विहित वेळेत न आल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बजावले आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, सहायक निवडणूक अधिकारी सचिन इथापे, सहायक निवडणूक अधिकारी अमित माळी यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर